रायगडावर सुवर्ण सिंहासनाची पुनर्स्थापना
By admin | Published: April 26, 2017 01:55 AM2017-04-26T01:55:49+5:302017-04-26T01:55:49+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण सिंहासनाची किल्ले रायगडवर पुनर्स्थापना करण्याची घोषणा शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी सोमवारी महाड येथे केली.
महाड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण सिंहासनाची किल्ले रायगडवर पुनर्स्थापना करण्याची घोषणा शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी सोमवारी महाड येथे केली. हे सिंहासन ३२ मण सोन्यात तयार करण्यात येणार असून, ५ जून रोजी किल्ले रायगडवर पाच लाख शिवभक्तांच्या उपस्थितीत त्याचा संकल्प सोडण्यात येणार असल्याची माहिती भिडे यांनी दिली.
शिवप्रतिष्ठानच्या महाड शाखेतर्फेसंभाजी भिडे यांचे व्याख्यान सोमवारी महाड येथे आयोजित केले होते. त्यावेळी भिडे बोलत होते.
महाराजांचा रायगडवर राज्याभिषेक झाला. त्यावेळी बत्तीस मण सोन्याचे सिंहासन तयार केले होते. नंतरच्या कामात ते नष्ट झाले. आता त्याच सिंहासनाची पुनर्स्थापना करण्याचा भिडे यांचा मानस आहे. नव्याने तयार करण्यात येणाऱ्या या सिंहासनाचे रक्षण करण्यासाठी एक हजार सशस्त्र धारकरी सज्ज असतील, असेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)