शरिरसंबंध प्रस्थापित करून लग्नास नकार

By Admin | Published: August 18, 2016 03:40 PM2016-08-18T15:40:03+5:302016-08-18T15:40:03+5:30

लग्नाचे आमिष दाखवून शरिरसंबध प्रस्थापित केल्यानंतर लग्नाला नकार देणा-या रविंद्र घनश्याम शाहू याच्याविरुद्ध त्याच्या प्रेयसीने बलात्काराचा आरोप लावला.

Reject marriage by establishing prostitution | शरिरसंबंध प्रस्थापित करून लग्नास नकार

शरिरसंबंध प्रस्थापित करून लग्नास नकार

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 18 : लग्नाचे आमिष दाखवून शरिरसंबध प्रस्थापित केल्यानंतर लग्नाला नकार देणा-या रविंद्र घनश्याम शाहू (वय २३, रा. विनोबा भावेनगर) याच्याविरुद्ध त्याच्या प्रेयसीने बलात्काराचा आरोप लावला. हे प्रकरण मार्च २०१४ ते ६ आॅगस्ट या कालावधीतील आहे.

तक्रारदार तरुणी (वय २१) आणि आरोपी शाहू या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. त्यांनी लग्नाच्या आणाभाकाही घेतल्या होत्या. ५ मार्च ते ६ आॅगस्ट दरम्यान आरोपीने तिच्याशी वारंवार शरिरसंबंध प्रस्थापित केले. आता मात्र तो लग्नास नकार देऊ लागला. तो दुस-याच तरुणीशी लग्न करणार असल्याचे कळल्यामुळे तरुणीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्याावरून यशोधरानगर पोलिसांनी शाहूविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला

Web Title: Reject marriage by establishing prostitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.