वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या मुख्याधिका-यांची बदली रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 05:16 AM2018-03-31T05:16:48+5:302018-03-31T05:16:48+5:30
लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातानंतर शासकीय अधिकाºयांच्या व्हॉटस्अॅप ग्रुपवर राज्य प्रशासनाविषयी
राजेश निस्ताने
मुंबई : लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातानंतर शासकीय अधिकाºयांच्या व्हॉटस्अॅप ग्रुपवर राज्य प्रशासनाविषयी दिशाभूल करणारी व मुख्यमंत्र्यांचा निषेध करणारी पोस्ट टाकणाºया नगरपरिषद मुख्याधिकाºयाची झालेली बदली ‘मॅट’चे चेअरमन अंबादास जोशी यांनी २६ मार्च रोजी रद्द ठरविली.
प्रतीक्षा कालावधीतील त्यांचे वेतन देण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. मुख्याधिकारी प्रमोद हरिभाऊ सावरखंडे यांना पूर्व पदावर तत्काळ नियुक्ती देण्याचे आदेशही जारी करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहेमतपूर नगरपरिषदेत ते कार्यरत होते. ३० जून २०१७ रोजी त्यांच्या जागेवर कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा येथील मुख्याधिकारी श्याम गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली होती. सावरखंडे यांंना कोणतीही नियुक्ती न देता प्रतीक्षेत ठेवण्यात आले.
बदलीमागील ठोस कारण स्पष्ट न झाल्याने अखेर सावरखंडे यांनी अॅड. अरविंद बांदिवडेकर यांच्यामार्फत मुंबई ‘मॅट’मध्ये (महाराष्टÑ प्रशासकीय न्यायाधीकरण) याचिका (क्र.६१४/२०१७) दाखल केली. त्यात नगरविकासच्या प्रधान सचिव आणि श्याम गोसावी यांना प्रतिवादी बनविण्यात आले.
सुरुवातीला बदलीचे कारण प्रशासनाने सांगितले नाही. नंतर अवरसचिव मिलिंद कुलकर्णी
यांनी १ आॅगस्ट २०१७ रोजी सादर केलेल्या शपथपत्रातून व्हॉटस्अॅप वरील वादग्रस्त पोस्टचे कारण पुढे आले.
प्रकरण ‘मॅट’मध्ये असताना सावरखंडे यांना नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे तात्पुरती नियुक्ती देण्यात आली.