रेखा यांचा कोरोना चाचणीस नकार; मुंबई महापालिकेच्या पथकाला दरवाजाही उघडला नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 04:01 PM2020-07-14T16:01:46+5:302020-07-14T16:05:29+5:30

बंगल्यातील सुरक्षारक्षकाला कोरोना झाल्यानंतर रेखा यांच्यासह त्यांची मॅनेजर फरजाना आणि घरातील चार अन्य कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करायची होती. मात्र, जेव्हा मुंबई महापालिकेतील कर्मचारी रेखा यांच्या घरी पोहोचले तेव्हा दरवाजाच उघडण्यात आला नाही.

Rekha refuses CoronaVirus test; Mumbai Municipal Corporation's team get back empty hand | रेखा यांचा कोरोना चाचणीस नकार; मुंबई महापालिकेच्या पथकाला दरवाजाही उघडला नाही

रेखा यांचा कोरोना चाचणीस नकार; मुंबई महापालिकेच्या पथकाला दरवाजाही उघडला नाही

Next

प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्यावरील सुरक्षारक्षक कोरोनाबाधित आल्यानंतर त्यांच्या बंगल्याच्या परिसरातील अन्य चार बंगल्यांचे सुरक्षारक्षकांनाही बाधा झाली आहे. या सर्वांना मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे. हे सुरक्षारक्षक रोज एकमेकांना भेटत होते. यामुळे त्यांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. यामुळे रेखा यांनी कोरोना चाचणी करण्यास नकार देत घरातच क्वारंटाईन केले आहे. 


बंगल्यातील सुरक्षारक्षकाला कोरोना झाल्यानंतर रेखा यांच्यासह त्यांची मॅनेजर फरजाना आणि घरातील चार अन्य कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करायची होती. मात्र, जेव्हा मुंबई महापालिकेतील कर्मचारी रेखा यांच्या घरी पोहोचले तेव्हा दरवाजाच उघडण्यात आला नाही. एका न्यूज चॅनेलनुसार महापालिकेच्या टीमने रेखा यांच्या दरवाजाची बेल वाजवली तेव्हा रेखा यांच्या मॅनेजरने येण्याचे कारण विचारले. पालिकेच्या पथकाने कोरोना चाचणी घेण्यासाठी आलो आहोत असे फरजाना यांना सांगितले.  तेव्हा फरजाना यांनी आपला नंबर घ्या आणि नंतर बोलू असे सांगितले. 


यामुळे महापालिकेच्या पश्चिम वॉर्डचे मुख्य़ वैद्यकीय अधिकारी संजय फगे यांनी फरजाना यांना फोन केला. त्यांनी सांगितले की रेखा या पूर्णपणे बऱ्या आहेत आणि आपले काम चांगल्यारितीने करत आहेत. रेखा या कोण्याच्याही संपर्कात आलेल्या नाहीत. यामुळे त्या कोरोनाची चाचणी करू इच्छित नसल्याचे फरजाना यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले.


यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रेखा यांचे घर सॅनिटाईज करण्यासाठी एक नवीन पथक पाठविले होते. त्यांनी घरात जाण्याचा प्रयत्न केला असता यावेळीही दरवाजा उघडण्यात आला नाही. यामुळे पथकाने बंगल्या बाहेरच्या भागाला सॅनिटाईज केले. सुरक्षा रक्षकांचे केबिनही सॅनिटाईज केले आणि मागे फिरले.


कायद्यानुसार कोरोना चाचणी करणे गरजेचे
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेखा या घरातून जास्त बाहेर येत नाहीत व कोणालाही भेटत नाहीत. मात्र, तरीही सावधगिरी बाळगण्यात काही हरकत नाही. रेखा यांनी कोरोनाची चाचणी करणे गरजेचे आहे. कारण ते कायद्यात आहे. कोरोना चाचणी प्रत्येक व्यक्तीला गरजेची आहे जे संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात आला असेल.

अन्य महत्वाच्या बातम्या...

क्रूरतेचा कळस! चीनने गलवानमध्ये मृत सैनिकांचे बलिदान नाकारले; अंत्यसंस्कारास नकार

OnePlus Nord चे फिचर्स लीक; स्वस्त फोनमध्ये 6 कॅमेऱ्यांचा सेटअप आणि बरेच काही

सॅमसंगची फ्रिजवर ऑफर! 38 हजारांचा स्मार्टफोन मोफत; 9 हजारांचा कॅशबॅकही

अमेरिकेकडून चीनविरोधात युद्धाची तयारी?; दुसऱ्या महायुद्धातील नौदलाच्या 'विध्वंसक' तळाची पुन्हा उभारणी

शूट टू किल! एक गोळी दुश्मन खल्लास; जवानांना मिळणार खतरनाक अमेरिकी रायफल

कोरोना पाठ सोडेना! बरा होतोय पण दोन महिन्यांनंतर दिसताहेत ही गंभीर लक्षणे

Web Title: Rekha refuses CoronaVirus test; Mumbai Municipal Corporation's team get back empty hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.