कवितेमुळे टिकतात नातेसंबंध

By admin | Published: April 1, 2017 01:43 AM2017-04-01T01:43:07+5:302017-04-01T01:43:07+5:30

जात-धर्म-पंथ यांच्या पलीकडे असते ती कविता. ही कविता मानवामधील नातेसंबंध टिकवून ठेवते. समाजाला कवेत घेण्याचे

Relationships sustained by poetry | कवितेमुळे टिकतात नातेसंबंध

कवितेमुळे टिकतात नातेसंबंध

Next

चिंचवड : जात-धर्म-पंथ यांच्या पलीकडे असते ती कविता. ही कविता मानवामधील नातेसंबंध टिकवून ठेवते. समाजाला कवेत घेण्याचे सामर्थ्य कवितेमध्ये असते, असे प्रतिपादन प्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर यांनी केले.
पिंपरी - चिंचवड महानगरपालिकेच्या कला, साहित्य आणि सांस्कृतिक धोरणांतर्गत आयोजित कविसंमेलनात ते बोलत होते. या वेळी महापौर नितीन काळजे, पक्षनेते एकनाथ पवार, उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक तुषार हिंगे, नगरसेविका शैलजा मोरे, शर्मिला बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर उपस्थित होते.
सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक के. ले. महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
या वेळी शुभेच्छा देताना काळजे म्हणाले, ‘‘या औद्योगिक नगरीत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी प्रशासनच तयार असणार आहे. पालिकेच्या सांस्कृतिक धोरणांतर्गत स्थानिक कलाकारांना संधी दिली जाईल.’’
या वेळी कविंनी सादर केलेल्या कवितेला रसिक भरभरून दाद देत होते. काही वेळा भावनात्मक कवितेमुळे रसिकांच्या डोळ्यात अश्रू ढळत होते. उत्तरोत्तर संमेलन रंगले. स्थानिक कविंच्या सहभागामुळे कविसंमेलन बहरले. (वार्ताहर)

सामाजिक कविता : टाळ्यांचा गजर
कविसंमेलनाची सुरुवात ज्येष्ठ कवी प्रा. तुकाराम पाटील यांच्या ‘माझ्या सुखाच्या संसारी’ क वितेने झाली. पहिल्या कवितेलाच रसिकांनी भरभरून दाद दिली. यानंतर राज अहिरराव, सुरेश कंक, दीपेश सुराणा, अनिल दीक्षित, अ‍ॅड. गोरक्ष लोखंडे, अरुण बोऱ्हाडे, किशोर केदारी, नितीन यादव, धनाजी कांबळे, राजेंद्र घावटे, सुहास घुमरे, भालचंद्र मगदुम, भूषण नांदुरकर, सिद्धार्थ भोसले, तुकाराम पाटील, चंद्रकांत धस, नंदकुमार कांबळे, महेंद्र गायकवाड, संगीता झिंजुर्के, शोभा जोशी, सुनील भिसे, प्रदीप गांधलीकर, रमेश वाकनीस, वर्षा बालगोपाल, सविता इंगळे, नंदकुमार मुरडे, माधुरी विधाते, धनंजय भिसे, दत्तू ठोकळे या कवींनी आपल्या कविता सादर केल्या.

Web Title: Relationships sustained by poetry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.