बेपत्ता प्रवाशांचे नातेवाईक संभ्रमावस्थेत : यंत्रणाही हतबल

By admin | Published: August 6, 2016 04:47 AM2016-08-06T04:47:40+5:302016-08-06T04:47:40+5:30

तिसऱ्या दिवशी देखील वाहून गेलेल्या वाहनांमधील बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्याचे शोधकाम युद्धपातळीवर सुरू आहे.

Relatives of the missing passengers in confusion: The mechanism also prevails | बेपत्ता प्रवाशांचे नातेवाईक संभ्रमावस्थेत : यंत्रणाही हतबल

बेपत्ता प्रवाशांचे नातेवाईक संभ्रमावस्थेत : यंत्रणाही हतबल

Next


महाड : सावित्री पूल दुर्घटनेनंतर आज शुक्रवारी तिसऱ्या दिवशी देखील वाहून गेलेल्या वाहनांमधील बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्याचे शोधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. आज सायंकाळी ५ वा. पर्यंत यापैकी २२ मृतदेह हाती लागले आहेत. अन्य बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यात अपशय येत असल्याने गेली तीन दिवस रात्रंदिवस या शोधकामात काम करणारी प्रशासकीय यंत्रणा हतबल झाल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर वाहून गेलेल्या वाहनांचाही तपास अद्यापही लागलेला नाही. घटनास्थळाजवळच असलेल्या शासकीय मदत केंद्रात मृतदेह शवविच्छेदनासाठी आणले जात आहेत. महाडच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. तेथील वातावरणही अत्यंत गंभीर असल्याचे दिसून येत आहे. मात्र अद्यापही अन्य बेपत्ता प्रवाशांचा शोध लागत नसल्याने गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या त्यांचे नातेवाईक संभ्रमावस्थेत पडल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Relatives of the missing passengers in confusion: The mechanism also prevails

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.