शहापूर-खोपोली महामार्गाची अधिसूचना जारी
By Admin | Published: March 2, 2017 05:29 AM2017-03-02T05:29:33+5:302017-03-02T05:29:33+5:30
शहापूर-मुरबाड-खोपोली महामार्गाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला
भातसानगर : शहापूर-मुरबाड-खोपोली महामार्गाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला असून, या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी हा महामार्ग व्हावा, यासाठी केंद्राकडे मागणी केली होती.
हा महामार्ग झाल्यावर वाहतूक वेगाने होऊन वाहतुकीवरील ताण कमी होईल, तसेच वेळेची बचतही होणार आहे. शहापूर-खोपोली महामार्ग हा फायद्याचा असून, आग्रा आणि पुणे महामार्गावरील ताण कमी करणारा आहे. केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी लगेचच पूर्तता केल्याने महामार्गाचा प्रश्न आता मोकळा झाला आहे. या महामार्गाला ५४८ ए असा क्रमांक देण्यात आला आहे. तासन्तास वाहतूककोंडीत अडकणाऱ्यांची यामुळे सुटका होणार आहे. यासंदर्भात खासदार पाटील यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘हा महामार्ग मंजूर व्हावा, यासाठी मी प्रत्यक्ष या मार्गाची पाहणी केली, नंतरच ती मागणी केली. हा महामार्ग होण्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी बजावलेली भूमिका महत्त्वाची होती,’ असे पाटील यांनी पुढे नमूद
केले. (वार्ताहर)