‘आपली माती, आपली माणसं’चे प्रकाशन

By Admin | Published: May 28, 2015 11:25 PM2015-05-28T23:25:28+5:302015-05-28T23:25:28+5:30

‘लोकमत’ पुरंदर तालुक्याच्या ‘आपली माती -आपली माणसं’ या विशेष पुरवणीचे पुरंदर तालुक्यात जंगी स्वागत झाले असून, जेजुरी नगर परिषदेच्या सभागृहात पुरवणीचे थाटात प्रकाशन करण्यात आले.

'Release Your Soil, Your Manas' | ‘आपली माती, आपली माणसं’चे प्रकाशन

‘आपली माती, आपली माणसं’चे प्रकाशन

googlenewsNext

जेजुरी : ‘लोकमत’ पुरंदर तालुक्याच्या ‘आपली माती -आपली माणसं’ या विशेष पुरवणीचे पुरंदर तालुक्यात जंगी स्वागत झाले असून, जेजुरी नगर परिषदेच्या सभागृहात पुरवणीचे थाटात प्रकाशन करण्यात आले.
जेजुरी पालिकेच्या सभागृहात या पुरवणीचे प्रकाशन जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साधना दरेकर, माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका साधना दिडभाई, मार्तंड देव संस्थानचे विश्वस्त व नगरसेवक सुधीर गोडसे, माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते मेहबूब पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले.
तीर्थक्षेत्र जेजुरीच्या प्रत्येक यात्रा-सणांना राज्यभर प्रसिद्धी देऊन जेजुरीच्या धार्मिक संस्कृतीचे महत्त्व वाढवण्याचे मोठे काम ‘लोकमत’च्या माध्यमातून होत आहे. ‘लोकमत’ चा हा उपक्रम अतिशय उत्कृष्ट असून, लोकांचा प्रतिसादही मोठा लाभलेला आहे.
‘लोकमत’ च्या विविध उपक्रमांतून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडत असल्याचे सांगून, या पुरवणीच्या माध्यमातून तालुक्यातील विविध क्षेत्रांचा आढावाच ‘लोकमत’ने वाचकांसमोर मांडला असल्याचे मार्तंड देव संस्थानचे विश्वस्त सुधीर गोडसे यांनी सांगितले़
‘लोकमत’च्या या पुरवणीमुळे तालुक्यातील जडणघडणीची
शिवाय ज्ञात-अज्ञात विषयांची, स्थळांची माहिती लोकांपर्यंत पोहोचत आहे. पुरंदरच्या विविध क्षेत्रांची
माहती या पुरवणीतून वाचावयास मिळाली. ‘लोकमत’चे विविध नावीन्यपूर्ण प्रयोग खरोखरच वाखाणण्याजोगे आहेत. अशा उपक्रमांतून महाराष्ट्राचे दर्शन घडत आहे.
राज्यभरात विविध उपक्रम राबवून लोकमतने राज्यात क्रमांक १ चे स्थान मिळविले आहे ते यामुळेच, असा माझा विश्वास असून, भविष्यात ‘लोकमत’कडून अशीच परंपरा कायम राहावी, अशी अपेक्षा व्यक्त करून ‘लोकमत’च्या उपक्रमांना आदिनाथ अ‍ॅग्रो लि. चे संचालक नितीन गांधी व त्यांच्या पत्नी वैशाली गांधी यांनी शुभेछा दिल्या.
प्रारंभी ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी बी. एम. काळे यांनी सर्वांचे स्वागत केले़ ‘लोकमत’ च्या या पुरवणीमागचा उद्देश ‘लोकमत’चे ग्रामीण विभाग प्रमुख विवेक भुसे यांनी प्रास्ताविकातून मांडला. ‘लोकमत’ च्या विविध उपक्रमाची माहिती जाहिरात व्यवस्थापक उल्हास पोंक्षे यांनी दिली़ जाहिरात व्यवस्थापक अशोक शिंदे यांनी आभार मानले,

आपली माती आपली माणसं’ या पुरवणीच्या माध्यमातून पुरंदरचा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच धार्मिक संस्कृतीचे दर्शन घडवले आहे. पुरंदरचा इतिहासच शब्दांत मांडून उद्याच्या पुरंदरचे चित्र समोर मांडले आहे. लोकमतचा हा उपक्रम वाखाणण्याजोगा आहे़
-साधना दरेकर,
नगराध्यक्षा, जेजुरी

४सध्याच्या काळात लोकप्रतिनिधीपेक्षाही मोठे काम मिडियाच्या माध्यमातून होत असल्याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे. जेजुरीत सामाजिक काम
करीत असताना जेजुरी रेल्वे स्टेशन आधुनिक स्टेशन व्हावे म्हणून प्रयत्न करताना ‘लोकमत’ने मला नेहमीच साथ दिली, सामाजिक कार्यकर्त्याला
आपले वर्तमानपत्र वाटावे अशीच ‘लोकमत’ची भूमिका असल्याचे निदर्शनास येत आहे. भविष्यात सर्वसामान्यांचेच नव्हे तर विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्तींना आपले वर्तमानपत्र वाटेल, असा विश्वास मेहबूब पानसरे यांनी
व्यक्त केला.
४साधना दरेकर म्हणाल्या, ‘‘लोकमत’ने अल्पावधीत जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळवला आहे. सर्वसामान्यांशी निगडित असणाऱ्या बातम्यांतून वाचकांशी जवळकीचे नाते जोडले आहे, लोकांच्या मतांचा जिथे आदर होतो तेच हे लोकमत वर्तमानपत्र आहे. म्हणूनच लोकमतने सर्वसामान्यांच्या हृदयात अल्पावधीत स्थान मिळवले आहे.’’

Web Title: 'Release Your Soil, Your Manas'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.