नेत्यांकडून होणार कोट्यवधींची वसुली ?

By admin | Published: September 16, 2015 01:02 AM2015-09-16T01:02:25+5:302015-09-16T01:02:25+5:30

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत झालेल्या १ हजार ५९६ कोटी रुपयांच्या आर्थिक नुकसानीत दोषी आढळल्यास तत्कालीन संचालक मंडळातील दिग्गज नेत्यांवर कारवाई होऊ शकते.

Releases billions of politicians? | नेत्यांकडून होणार कोट्यवधींची वसुली ?

नेत्यांकडून होणार कोट्यवधींची वसुली ?

Next

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत झालेल्या १ हजार ५९६ कोटी रुपयांच्या आर्थिक नुकसानीत दोषी आढळल्यास तत्कालीन संचालक मंडळातील दिग्गज नेत्यांवर कारवाई होऊ शकते. ज्यांच्याविरोधात आरोप आहेत ते दोषी आढळल्यास त्यांच्याकडून तोट्याची वसुली होऊ शकते. तसेच त्यांना सहकार क्षेत्रातील निवडणुका लढविण्यास सहा वर्षे प्रतिबंध करण्यात येऊ शकतो.
राज्य शिखर बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अतिरिक्त सहकार आयुक्त शिवाजी
पाहिनकर यांनी बँकेच्या संचालक मंडळाचे तत्कालीन सदस्य असणाऱ्या नेत्यांना आरोपपत्र पाठविले आहे.
या प्रकरणाची सुनावणी २८ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, सर्वांना उलट तपासणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)

निष्क्रियतेवर ताशेरे
महाराष्ट्र सहकार कायद्यांतर्गत चौकशी अधिकाऱ्याला न्यायालयाप्रमाणे अधिकार आहेत. त्यामुळे त्याला केवळ मुंबई उच्च न्यायालयातच आव्हान देता येऊ शकते. महाराष्ट्र सहकार आयुक्तांनी दिलेल्या अहवालात बँकेतील अनियमितता आणि १ हजार ५९६ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान याबद्दल तत्कालीन संचालक मंडळाच्या निर्णय, कृती आणि निष्क्रियता यावर आरोप ठेवण्यात आले आहेत.

साखर कारखान्यांवर वरदहस्त
संचालक मंडळाने पाच वर्षांच्या काळात राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने व सूतगिरण्यांना नियम डावलून कर्ज दिले आहेत. जवळपास ८ कारखान्यांना वितरित केलेले २९६ कोटी रुपयांचे कर्जही वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. यामध्ये नंदुरबारमधील सातपुडा कारखान्याकडे १२९ कोटी, नांदेडमधील जयवंत पाटील कारखान्याला २८.५४ कोटी, स्वामी समर्थला ६.४४ कोटी, संत भोगावती ३.९९ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.

नियमबाह्य कर्जवाटप
तत्कालीन संचालक मंडळावर एकूण १० आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यात साखर कारखाने आणि सूत गिरण्यांना कर्ज देताना नाबार्डच्या सूचना व मार्गदर्शक तत्त्वांची पायमल्ली करून नियमबाह्य कर्जवाटप करणे, विनातारण व अपात्र संस्थांना कर्जपुरवठा करणे आदी आरोपांचा समावेश आहे.

दोषींवर तीन महिन्यांत फौजदारी गुन्हे
सहकार कायद्याच्या कलम ८८नुसार राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याची चौकशी सुरू झाली असून, जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता ज्या ७७ जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल. त्याची सुनावणी पुढील तीन महिन्यांत पूर्ण करून फौजदारी गुन्हे दाखल करू.
- चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री

संचालकनिहाय नुकसानीची निश्चित केलेली जबाबदारी ...
नाव ..........रक्कम
अजित पवार २३,५६,४९,६१४
विजयसिंह मोहिते पाटील५,६१,९०,६०६
हसन मुश्रीफ१,७४,५१,०८३
पांडुरंग फुंडकर४,२८,८४,८००
आनंदराव आडसूळ२०,८५,५८,०९३
माणिकराव कोकाटे४,२८,८४,८००
मधुकर चव्हाण२०,३५,२२,६२९
यशवंतराव गडाख६,८१,६०,८५९
विजय वडेट्टीवार४,२८,८४,८००
दिलीपराव सोपल१,७६,५१,०८३
हसन मुश्रीफ१,७४,५१,०८३
मदन पाटील १७,३२,५७,७५९
जगन्नाथ पाटील१९,४७,२४,०९६
जयवंतराव आवळे१६,१९,१९,८८२
रामप्रसाद बोर्डीकर३,७९,२९,८२०
राजेंद्र शिंगणे१६२४४४७९८
रजनीताई पाटील३,६०,३६,५७६
चंद्रशेखर घुले पाटील७५,३२,०७०
जयंत पाटील२२,१२,५५,१९७
मीनाक्षी पाटील१,१९,८६,६९४
विलासराव जगताप४,२८,८४,८००
देवीदास पिंगळे१९,८६,१२,७०७
गुलाबराव शेळके२०,१६,८९,२४६
माणिकराव पाटील२,४६,४९,९९१
अमरसिंह पंडित४,२८,८४,८००
शिवाजी नलावडे३,३९,०८,८५४
डॉ. वसंत पवार २६,६२,०३०
सदाशिव मंडलिक१५,८०,७४०
राजन तेली४,२८,८४,८००
राहुल मोटे४,२८,८४,८००
राजवर्धन कदमबांडे२,४६,४७,४२९
पृथ्वीराज देशमुख१९,९५,६८,२२८
प्रसाद तनपुरे१,९६,३२,९१०
बाळासाहेब सरनाईक२४ कोटी ६४ लाख

Web Title: Releases billions of politicians?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.