रिलायन्स, टाटासाठी दरनिश्चिती
By Admin | Published: October 22, 2016 01:40 AM2016-10-22T01:40:14+5:302016-10-22T01:40:14+5:30
नेहमीच शॉक देणाऱ्या वीज कंपन्यांना महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने दणका दिल्याने त्यांनी वीजदर कपात केली आहे. वीजदरवाढीसाठी आयोगाकडे कंपन्यांनी प्रस्ताव
मुंबई : नेहमीच शॉक देणाऱ्या वीज कंपन्यांना महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने दणका दिल्याने त्यांनी वीजदर कपात केली आहे. वीजदरवाढीसाठी आयोगाकडे कंपन्यांनी प्रस्ताव दाखल केल्यानंतर २१ आॅक्टोबर रोजी आयोगाने याबाबत निर्णय दिला. त्यानुसार १०० युनिटपर्यंतची वीज वापरणाऱ्या ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. १ आॅक्टोबरपासून आयोगाने लागू केलेले वीजदर आकारले जाणार आहेत. २०१६-१७ ते २०१९-२० या चार वर्षांकरिता आयोगाने वीजदर निश्चित केला
आहे. आयोगाने रेल्वे, मेट्रो
आणि मोनोरेल या सर्वांचे वीजदर एकत्रित केले आहेत. आयोगाने सार्वजनिक पाणीपुरवठा योजना आणि सांडपाणी व मलनि:सारण प्रकल्प नावाचा एक नवा वर्ग निर्माण केला आहे. या वर्गात सरासरी आकारणीचा दर हा वीजपुरवठ्याच्या सरासरी खर्चापेक्षा कमी असणार आहे.
रिलायन्सने चालू आर्थिक वर्ष २०१६-१७करिता सरासरी वीजदरात प्रस्तावित केलेल्या ६ टक्के वाढीऐवजी आयोगाने १.९३ टक्के कपात मंजूर केली आहे. २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या आर्थिक वर्षांमध्येदेखील आयोगाने सरासरी वीजदर अनुक्रमे ०.७६, १.०६, १५.१३ टक्क्यांनी कमी केला आहे. रिलायन्सने या वर्षांसाठी वीजदरांमध्ये ३ टक्के वार्षिक वाढ मागितली होती. टाटाने आर्थिक वर्ष २०१६-१७करिता सरासरी वीजदरात मागितलेल्या १७ टक्के कपातीऐवजी आयोगाने १.८५ टक्के वाढ मंजूर केली आहे. २०१७-१८, २०१८-१९ या आर्थिक वर्षांत आयोगाने अनुक्रमे सरासरी वीजदर २.२६ आणि २.५१ टक्के वाढविला आहे. २०१९-२०मध्ये सरासरी वीजदर १४.९३ टक्क्यांनी कमी केला आहे. टाटाने २०१७-१८ आणि २०१८-१९करिता ६ आणि २ टक्के वाढ व २०१९-२०करिता २ टक्के कपातीची मागणी केली होती. (प्रतिनिधी)
असे आहेत नवे वीजदर
टाटाचे वीजदर (२०१६-१७साठी)
युनिटवीजदर
१०१-३००५.१७
३०१-५००९.५७
५००११.८४
१०१-३००७.६५
३०१-५००९.०९
५००१०.९८