केदारनाथमधील महाराष्ट्रातील भाविक सुरक्षित
By admin | Published: May 13, 2014 11:23 PM2014-05-13T23:23:12+5:302014-05-14T02:05:47+5:30
केदारनाथ यात्रेसाठी महाराष्ट्रातून गेलेले सुमारे १५० भाविक सुरक्षित आहेत. पहिल्या टप्प्यातील ५१ भाविकांचे केदारनाथ दर्शन होऊन ते बद्रिनाथकडे रवाना झाले आहेत
नाशिक : केदारनाथ यात्रेसाठी महाराष्ट्रातून गेलेले सुमारे १५० भाविक सुरक्षित आहेत. पहिल्या टप्प्यातील ५१ भाविकांचे केदारनाथ दर्शन होऊन ते बद्रिनाथकडे रवाना झाले आहेत, अशी माहिती चौधरी यात्रा कंपनीचे संचालक ब्रीजमोहन चौधरी यांनी दिली. हिमवृष्टी व खराब हवामानामुळे १६ मे पर्यंत केदारनाथ यात्रा थांबविण्यात आली आहे.
दुसर्या व तिसर्या टप्प्यातील ६० भाविक हरिद्वारमध्ये तर उर्वरित हरिद्वारजवळ असल्याचेही चौधरी यांनी सांगितले. बद्रिनाथकडे रवाना झालेले भाविक खराब हवामानामुळे पिंपळकोठी येथे थांबले आहेत. राज्यातील भाविकांचा ३०-३० जणांचा गट करून चार टप्पे केले असून, हवामान खात्याने हिरवा झेंडा दाखविताच एक-एक गटपुढे रवाना होणार आहे. (प्रतिनिधी)
-------------------