दिगंबर कामत यांना दिलासा
By admin | Published: August 6, 2015 12:48 AM2015-08-06T00:48:56+5:302015-08-06T00:48:56+5:30
गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार असून तोपर्यंत त्यांना अटक केली जाणार नाही. ‘जैका’ प्रकरणात
पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार असून तोपर्यंत त्यांना अटक केली जाणार नाही. ‘जैका’ प्रकरणात अटकेची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.
‘जैका’ प्रकल्पातील एक कंत्राटदार कंपनी लुईस बर्जर इंटरनॅशनलकडून गोव्यातील माजी मंत्र्यांना लाच दिल्याचे अमेरिकेच्या न्यायालयात उघडकीस आल्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. कंपनीच्या माजी अधिकाऱ्यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दिलेल्या जबाबात कामत व सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांना लाच दिल्याचे नमूद केल्यानंतर या दोन्ही नेत्यांच्या मागे क्राईम ब्रँचचे शुक्लकाष्ठ लागले आहे.
(प्रतिनिधी)