भूखंड गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांना २४ फेब्रुवारीपर्यंत पुन्हा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 06:38 IST2021-02-18T02:35:27+5:302021-02-18T06:38:16+5:30
Eknath Khadse : न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी २४ फेब्रुवारी रोजी ठेवत तोपर्यंत खडसे यांना दिलासा दिला.

भूखंड गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांना २४ फेब्रुवारीपर्यंत पुन्हा दिलासा
मुंबई : भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना उच्च न्यायालयाने दिलेला दिलासा २४ फेब्रुवारीपर्यंत कायम केला आहे. युक्तिवाद पूर्ण न झाल्याने न्यायालयाने याचिकेवर पुढील सुनावणी २४ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे.
भोसरी एमआयडीसीमधील तीन एकर भूखंड गैरव्यवहाराबाबत ईडीने चौकशी सुरू केली आहे. न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी २४ फेब्रुवारी रोजी ठेवत तोपर्यंत खडसे यांना दिलासा दिला.