घर घेणाऱ्यांना दिलासा, आता सुट्टीच्या दिवशीही करता येणार रजिस्ट्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 11:13 PM2023-05-03T23:13:35+5:302023-05-03T23:14:02+5:30

नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही घरांची नोंदणी करता येणार आहे, महसूल मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती.

Relief for home buyers now registration can be done even on holidays maharashtra vikhe patil | घर घेणाऱ्यांना दिलासा, आता सुट्टीच्या दिवशीही करता येणार रजिस्ट्रेशन

घर घेणाऱ्यांना दिलासा, आता सुट्टीच्या दिवशीही करता येणार रजिस्ट्रेशन

googlenewsNext

मुंबई : सामान्य जनतेच्या सोयीसाठी जिल्हा मुख्यालय आणि महानगरपालिका क्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालये शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना दस्त नोंदणीत अडचण निर्माण होणार नाही आणि यापुढे नॉनस्टॉप दस्त नोंदणी होणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 

खरेदी -विक्री व्यवहारामध्ये वाढ होत असल्याने नागरिकांना त्यांच्या कामाच्या वेळेत दस्त नोंदणी करणे शक्य होत नाही, तसेच दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची वाढती गर्दी वाढत लक्षात घेता नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही दस्त नोंदणी करता यावी या दृष्टिकोनातून हा महत्चा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई विभागातील (मुंबई शहर, उपनगर), कोकण विभागातील (ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, पालघर, रायगड अलिबाग), पुणे विभागातील (सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर), अमरावती विभागातील (अकोला, अमरावती),  नागपूर विभागातील (नागपूर), लातूर विभागातील( लातूर, नांदेड), नाशिक विभागातील( नाशिक, जळगाव), औरंगाबाद विभागातील (औरंगाबाद) जिल्हा मुख्यालय आणि महानगरपालिका क्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालये शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. तसंच या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. 

नुकतंच राज्यात नवीन वाळू धोरणंही लागू करण्यात आलं होतं. यामुळे अवघ्या ६०० रुपयांमध्ये एक ब्रास वाळू मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. तसंच महाराष्ट्रातील शासकीय वाळू विक्री केंद्राचं उद्धाटनही महसूल मंत्र्यांनी केलं होतं.

Web Title: Relief for home buyers now registration can be done even on holidays maharashtra vikhe patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.