एसटी कर्मचा-यांना दिलासा, वेतनकपातीची टांगती तलवार मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 02:52 AM2017-11-16T02:52:09+5:302017-11-16T02:52:24+5:30

एसटी संप प्रकरणी राज्यातील एक लाखांहून अधिक कर्मचा-यांना दिलासा देणारा निर्णय परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घेतला आहे.

 Relief to the ST employees, paycheck money back | एसटी कर्मचा-यांना दिलासा, वेतनकपातीची टांगती तलवार मागे

एसटी कर्मचा-यांना दिलासा, वेतनकपातीची टांगती तलवार मागे

Next

मुंबई : एसटी संप प्रकरणी राज्यातील एक लाखांहून अधिक कर्मचा-यांना दिलासा देणारा निर्णय परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घेतला आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत संप प्रकरणी ‘एक दिवसाच्या अनधिकृत गैरहजेरीसाठी आठ दिवस वेतनकपात’ हा ठराव रद्द करण्यात यावा, असा प्रस्ताव संचालक मंडळाच्या पुढील बैठकीत मांडण्याचे आदेश मंत्री रावते यांनी दिले आहेत.
२८ ते ३० आॅक्टोबरदरम्यान परिवहन मंत्री धाराशिव दौºयावर असताना महामंडळाने कर्मचाºयांच्या वेतनकपातीबाबतचे परिपत्रक काढले होते. मात्र या परिपत्रकाचे अवलोकल केल्यास त्यातील तरतुदी या कर्मचाºयांवर अन्याय करणाºया आहेत. त्यामुळे संचालक मंडळाच्या पुढील बैठकीत मूळ ठरावच रद्द करण्याचा प्रस्ताव आणण्यात यावा, अशा सूचना मंत्री रावते यांनी अधिकाºयांना दिल्या. मूळ ठराव रद्द झाल्याने ३० आॅक्टोबरचे परिपत्रक रद्द होणार आहे.
असा आहे मूळ ठराव
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तत्कालीन संचालक मंडळाने २९ जानेवारी २००५ रोजी बैठक बोलावली होती. यात एसटी कर्मचाºयांच्या बाबतीत संप, बंद, उपोषण प्रकरणी गैरहजर राहिल्यास ‘एका दिवसासाठी आठ दिवस’ या प्रमाणात वेतनकपात करण्याचा ठराव झाला होता. या ठरावला अनुसरून ७ मे २००५ रोजी तसे परिपत्रकही काढण्यात आले होते.

Web Title:  Relief to the ST employees, paycheck money back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.