शेतकऱ्यांना दिलासा; पीक विमा काढण्यासाठी तीन दिवसांची मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 08:05 AM2023-08-01T08:05:41+5:302023-08-01T08:07:00+5:30

या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पीक विमा अर्ज भरण्याची मुदत ३ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत ही माहिती दिली.  

relief to farmers Three days extension for taking crop insurance | शेतकऱ्यांना दिलासा; पीक विमा काढण्यासाठी तीन दिवसांची मुदतवाढ

सध्या पावसाने उसंत घेतली असून, पिकांच्या आंतरमशागतीला वेग आला आहे. (छाया : मनीष तसरे)

googlenewsNext

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. मात्र, शेतकऱ्यांना अर्ज दाखल करताना अडचणी येत असल्याने मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य सरकारच्या कृषि विभागाकडून केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पीक विमा अर्ज भरण्याची मुदत ३ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत ही माहिती दिली.  

दीड कोटी भरले अर्ज 
    कोकण    १,७३,९५४ 
    नाशिक    ११,१३,३५८
    पुणे    १६,३६,३८०
    कोल्हापूर    ४,७६,१८७
    छ. संभाजीनगर    ३८,३०,७८९
    लातूर    ३९,५९,३७०
    अमरावती    २७,६०,१९३
    नागपूर    १०,९७,५६७
    एकूण    १,५०,४७,७९८

किती शेतीला मिळणार विमा कवच?
९६,६२,२६१ हेक्टर क्षेत्र - मागील वर्षी 
९९,१७,२२४ हेक्टर क्षेत्र - यंदा

 

Web Title: relief to farmers Three days extension for taking crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.