मुंबई हायकोर्टाने मॅगीवरील बंदी उठवल्याने 'नेस्ले'ला दिलासा
By admin | Published: August 13, 2015 12:04 PM2015-08-13T12:04:09+5:302015-08-13T13:08:58+5:30
मुंबई उच्च न्यायालयeने काही अटींसह मॅगीवरील बंदी उठवली असून नेस्ले कंपनीला दिलासा मिळाला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात शिसे आढळल्याने मॅगीवर लावण्यात आलेली बंदी मुंबई हायकोर्टाने सशर्त उठवली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे 'नेस्ले' कंपनीला तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
भारतीय अन्न सुरक्षा व दर्जा प्राधिकरण तसेच अन्न व औषध प्रशासन (महाराष्ट्र) यांनी मॅगीवर घातलेल्या बंदीविरोधात नेस्ले कंपनीने केलेल्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने काही अटी घालत ही बंदी उठवण्याचा निर्णय दिला. ज्या प्रयोगशाळांमध्ये मॅगीची चाचणी करण्यात आली होती त्या वैध नसल्याचे सांगत मोहाली (पंजाब), हैदराबाद व जयपूर येथील प्रयोगशाळांमध्ये मॅगी नूडल्सची प्रत्येकी पाच सँपल्स चाचणीसाठी पाठवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या चाचण्यांचा निकाल ६ आठवड्यांच्या आत येणे अपेक्षित असून त्यात मॅगीतील शिशाचं प्रमाण निर्धारित मात्रेत आढळले तरच नेस्लेला मॅगीचे उत्पादन व विक्री करण्याची परवानगी मिळेल, असे न्यायालयाने नमूद केले आहे.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे 'नेस्ले'ला तूर्तास तरी मोठा दिलासा मिळाला असून निकालानंतर लगेच 'नेस्ले' कंपनीचा शेअर वधारला आहे.