धार्मिक वाद देशाला परवडणारा नाही - श्रीपाल सबनीस
By admin | Published: September 10, 2016 06:42 PM2016-09-10T18:42:56+5:302016-09-10T18:42:56+5:30
धार्मिक वाद देशाला परवडणारा नाही, असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांनी केले
Next
>ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 10 - समाजात धार्मिकतेचा उन्माद माजला आहे. मात्र, लोकशाहीत सामान्य माणसाचे महत्त्व कमी लेखता येत नाही. हिंदू-मुस्लिमांच्या भांडणात अडकलेल्या या देशाला शांत करायचे असेल तर साहित्य व कलेची दखल आपल्याला घ्यावी लागेल. साहित्यिकच देशाला नवी दिशा व सात्त्विक विचार देऊ शकतात. धार्मिक वाद देशाला परवडणारा नाही, असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांनी केले.
पानफूल प्रकाशनचे प्रकाशक द.शं. बडगुजर लिखित कादंबरी ‘माणुसकीच्या शोधात’, काव्यसंग्रह ‘प्रेम विरहीत समुद्र’ व कथासंग्रह ‘कोट-पॅँट-मनिला’ या तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा शनिवारी दुपारी ३.३० वाजता शहरातील भारतीय जैन संघटनेच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमप्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉ.सबनीस बोलत होते.