लहान मुलांच्या मातमबाबत धर्मगुरुंनी विचार करावा - मुंबई उच्च न्यायालय
By admin | Published: December 9, 2014 07:20 PM2014-12-09T19:20:36+5:302014-12-10T11:27:03+5:30
लहान मुलांच्या मातममधील सहभागाबाबत धर्मगुरुंनी विचार करावा, असे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायधीश व्हि.एम. कानडे आणि न्या. रेवती मोहिते डेरे यांनी म्हटले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - लहान मुलांच्या मातममधील सहभागाबाबत धर्मगुरुंनी विचार करावा, याबाबत आम्ही कोणतीही प्रतिक्रीया नोंदवत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायधीश व्हि.एम. कानडे आणि न्या. रेवती मोहिते डेरे यांनी म्हटले आहे. मोहरमनिमित्त होणा-या मातममध्ये लहान मुलांचा सहभाग असतो याबाबत एका व्यक्तिने न्यायालयात याचिका दाखल केली होती, या याचिकेवर न्यायधिशांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रीया देण्याचे टाळले आहे. येत्या १४ डिसेंबर रोजी मोहरम पारंपरीक पद्धतीने होण्यासही न्यायालयाने कोणतीही हरकत घेतली नाही.
या प्रकरणी राज्य सरकारची बाजू राज्याचे महाधिवक्ता सुनिल मनोहर यांनी मांडली असून, मोहर्रमचे चित्रिकरण करण्यात येईल तसेच गंभीर जखम झाल्यास अँब्युलन्स आणि प्रथमोपचार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान शिया पंथीयांनी न्यायालयात गर्दी केली होती. न्यायालयातील वाढत्या गर्दिला पोलिसांनी प्रतिबंध केला. तसेच शिया पंथाच्या वतीने नेमण्यात आलेल्या वकिलांनी याचिका निकाली काढावी अशी मागणी केली. याचिकाकर्ते फैझल मोहम्मद बनारसवाला हे सुन्नी पंथाचे असून त्यांना याचिकामागेघ्यावी म्हणून धमक्या देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. कर्बाला येथील युद्धात मोहम्मद पैगंबरांचा नातू इमाम हूसेन अली यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूच्या स्मरणार्थ मोहरम केला जातो.