देशात धार्मिक दहशतवादाचा संघाचा प्रयत्न

By Admin | Published: March 13, 2016 04:56 AM2016-03-13T04:56:29+5:302016-03-13T04:56:29+5:30

सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थक हे तेवढे देशभक्त व यांच्या विरोधात जाणारे देशद्रोही, अशा प्रकारचे वातावरण निर्माण करून भाजपा व संघ देशात धार्मिक दहशतवाद पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे

Religious terrorism efforts in the country | देशात धार्मिक दहशतवादाचा संघाचा प्रयत्न

देशात धार्मिक दहशतवादाचा संघाचा प्रयत्न

googlenewsNext

नागपूर : सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थक हे तेवढे देशभक्त व यांच्या विरोधात जाणारे देशद्रोही, अशा प्रकारचे वातावरण निर्माण करून भाजपा व संघ देशात धार्मिक दहशतवाद पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे नेते माजी खासदार डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
आधी मुस्लिमांना देशद्रोही ठरवून आता त्यांनी आपला मोर्चा आंबेडकरवादी व मार्क्सवादीच्या बाजूने वळविला आहे. हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला प्रकरण असो की, जेएनयूमधील कन्हैया कुमार व त्यांच्या साथीदारांना देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न चालविला आहे. हे थांबविण्यासाठी दुसऱ्या लोकशाहीचा लढा उभारण्यात येणार आहे. यासाठी ३ एप्रिल रोजी नागपुरातील कस्तुरचंद पार्क येथे आंबेडकरवादी, डावी आघाडी व ओबीसी संघटनांच्या वतीने जनजागृती सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Religious terrorism efforts in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.