धडपड ‘तिच्या’ रिलाँचिंगची!

By admin | Published: February 26, 2017 02:05 AM2017-02-26T02:05:11+5:302017-02-26T02:05:11+5:30

भारतातील महिलांना अनेक सामाजिक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत, बऱ्याचदा या जबाबदाऱ्यांमुळे महिलांना आपली कारकिर्द थांबवावी लागते किंवा मग त्याला

Reluctant! | धडपड ‘तिच्या’ रिलाँचिंगची!

धडपड ‘तिच्या’ रिलाँचिंगची!

Next

- स्नेहा मोरे

भारतातील महिलांना अनेक सामाजिक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत, बऱ्याचदा या जबाबदाऱ्यांमुळे महिलांना आपली कारकिर्द थांबवावी लागते किंवा मग त्याला अल्पविराम द्यावा लागतो. मात्र, अल्पविराम देणाऱ्या महिलांना वर्षभरातच पुन्हा एकदा काम करण्याची इच्छा असते; परंतु त्यासाठी मार्ग मिळविणे कठीण होते. या गोष्टीवर उपाय म्हणून तंत्रज्ञान उद्योगात महिलांच्या नेतृत्वाची कमतरता पाहता अंशु सिंह आणि ज्योतिका सिंह यांनी या अनुभवी महिलांना नेतृत्वाच्या त्याच पदांवर परत काम करण्यासाठी मदत करण्याचा मार्ग शोधून काढण्याचा निर्णय घेतला. महिला व्यावसायिकता लक्षात ठेवून त्यांनी मार्च २०१३मध्ये ‘relauncHER’  ची सुरुवात केली.
ज्याचा उद्देश व्यावसायिकपणे महिलांना त्यांच्या पूर्वीच्या पदांवर कामावर येण्यासाठी मदत करणे हा होता. हा व्यवसाय मुख्यत: अनुभवी आणि उच्च कुशल महिला व्यावसायिकांवर केंद्रित आहे. व्यावसायिक महिलांना संकेतस्थळावरून ज्या प्रकारे सेवा हवी असेल त्या प्रकारे अर्ज भरून त्याची नोंदणी करावी लागते. नोंदणीनंतर उमेदवाराच्या प्रोफाइलचे मूल्यांकन केले जाते तसेच फोनवरून चर्चा करून उमेदवाराची योग्यता आणि व्यावहारिक कौशल्याचे मूल्यांकन केले जाते. ज्या वेळी व्यावसायिकाची निवड केली जाते त्या वेळी त्यांना डोमेन आणि स्थान यांच्या आधारे, सहयोगी कार्यक्रम सोपविला जातो. पूर्णत: चौकशीनंतर जर प्रोफाइल नियुक्तीप्रमाणे गरजेनुसार योग्य असेल तर रिझ्युम कंपनीला पाठविला जातो. कंपनी तांत्रिक मूल्यांकनाच्या प्रक्रियेतून निवड करते. जर उमेदवाराच्या तांत्रिक किंवा कौशल्याच्या बाबतीत कमतरताअसेल तर त्यावर जास्त काम करावे लागते. त्या वेळी त्यांना आवश्यक प्रशिक्षण देऊन तयार केले जाते. प्रत्येक स्थितीत उमेदवाराला नियोक्त्याशी कसे बोलावे किंवा प्रगती कशी करावी याबाबत सूचना दिल्या जातात. रिटर्नर कार्यक्रमात निवड झालेल्या उमेदवाराला जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून मूल्यांकन करून कायमस्वरूपी कामावर ठेवले जाते.
ही कंपनी दोन प्रकारच्या सेवा देते. पहिले ‘relauncHER’   ज्यात महिलांना रिज्यूम, लिंक्डइन प्रोफाइल आणि मुलाखत देण्याच्या कलेत पारंगत केले जाते. व्यावसायिकांना त्यांच्या प्रोफाइलच्या गरजेनुसार योग्य प्रशिक्षणाबाबतदेखील सांगितले जाते. या कार्यक्रमात उमेदवारांना सुरुवातीपासूनच पूर्णवेळ कामावर ठेवले जाते. दुसरे Freelancer and SelfstartHER ज्यात व्यावसायिकांना उद्यमी म्हणून आॅनलाइन उपस्थिती ठेवण्यास मदत करतो. याविषयी ज्योतिका सांगतात की, स्थापित नियुक्त्यांना अनुभवी आणि कुशल प्रशिक्षित महिला व्यवसायी उपलब्ध करून देतो. ज्यामध्ये वरिष्ठ स्तरावरील आणि नेतृत्वाच्या भूमिकेतील महिलांना प्रोत्साहन देऊ इच्छितात. ज्यांना अनुभवी प्रतिभांची गरज आहे, परंतु उमेदवार शोधू शकत नाहीत. या माध्यमातून शेवटचा उद्देश व्यावसायिकांना नोकऱ्या मिळवून देणे हा आहे, त्यांचा कार्यक्रम अनुभवी कर्मचारी कंपन्यांपर्यंत पोहोचविण्याचा सरळ मार्ग देतो. कंपन्यांना मध्य वरिष्ठ स्तरावरच्या नेतृत्वाच्या भूमिकांसाठी अत्यंत कुशल, योग्य महिलांची प्रतिभा मिळते. हे खरेतर संघटनेत पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या संतुलित ठेवण्याचे प्रयत्न आहेत. जर कंपनी मूल्यांकनानंतरही उमेदवाराला नोकरीवर ठेवत नसेल तरी त्यांच्याजवळ अनेक पर्याय असतात.
आय टी क्षेत्रापासून सुरुवात केली आणि आता हळूहळू अन्य क्षेत्रसुद्धा वाढवित आहोत. नोंदणी आणि प्रोफाइल देणे उमेदवारांसाठी वर्तमानात नि:शुल्क आहे. व्यावसायिक महिलांशी केलेल्या चर्चेतून हीच गोष्ट समोर आली की, सर्व महिलांना पूर्णवेळ काम करणे शक्य नाही, परंतु त्या आपले शिक्षण, अनुभव यांचा उपयोग करू इच्छितात. महिलांना त्यांच्या प्रतिभा आणि कौशल्याचा वापर करून आपल्या महत्त्वाकांक्षाना साकार करण्यात, उद्यमींना जोडण्यात आणि डिजिटल तसेच समाज माध्यमातून जोडण्यास मदत करून महिलांना सक्षम बनविण्याचा हा एक प्रयत्न आहे, असे अंशूने सांगितले.

Web Title: Reluctant!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.