निकालाला धीराने सामोरे जा

By admin | Published: June 8, 2015 05:36 AM2015-06-08T05:36:37+5:302015-06-08T06:01:31+5:30

निकाल जाहीर झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळेलच असे होत नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी निराश न होता निकालाला धीराने सामोरे जावे.

Remain enduring patience | निकालाला धीराने सामोरे जा

निकालाला धीराने सामोरे जा

Next

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सोमवारी दहावीचा निकाल आॅनलाईन जाहीर होणार आहे. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळेलच असे होत नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी निराश न होता निकालाला धीराने सामोरे जावे. तसेच कमी गुण मिळाले म्हणून परंपरागत करिअरचे क्षेत्र न निवडता कल चाचणी करून पुढील अभ्यासक्रमाची निवड करावी, असा सल्ला पुणे विभागीय शिक्षण मंडळाच्या समुपदेशकांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.
परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी अधिक गुण मिळतच असतात. त्यात गेल्या काही वर्षांपासून राज्य शिक्षण मंडळातर्फे सर्वोत्तम पाच पद्धतीने निकाल जाहीर केला जातो. त्यामुळे नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. विद्यार्थ्यांनी निकालाच्या भीतीने कोणतेही अनुचित पाऊल उचलू नये.
दहावीची परीक्षा म्हणजे जीवनातील शेवटची परीक्षा नाही. त्यामुळे या परीक्षेत अपयश आले तरी खचून जाऊ नका, असा सल्ला समुपदेशकांनी दिला आहे.
पुणे विभागीय शिक्षण मंडळाचे समुपदेशक सुधीर खाडे म्हणाले, सर्वोत्तम पाच अर्थात बेस्ट आॅफ फाईव्ह पद्धतीने दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात. शासनाच्या किंवा खासगी संस्थांमधून बुध्यांक किंवा कल चाचणी करून विद्यार्थ्यांनी करिअर निवडावे. (प्रतिनिधी)

पाल्याला अधिकाधिक गुण मिळावेत अशी पालकांची इच्छा असते. मात्र, पालकांच्या इच्छेप्रमाणे मुलांना यश मिळाले नाही तर पालक रागावतात. पालकांनी निकालाच्या दिवशी मुलांशी रागावून न बोलता शांतपणे संवाद साधणे आवश्यक आहे.
- सुधीर खाडे, समुपदेशक,
पुणे विभागीय शिक्षण मंडळ

मुलांनी वर्षभर कष्ट करून
गुण मिळवलेले असतात. त्यामुळे कितीही टक्के गुण मिळविले, तरी त्यांचे कौतुक केले पाहिजे.
अपयश आल्यास पुन्हा नव्याने उभे राहण्याची प्रेरणा द्यायला हवी. त्याचप्रमाणे आपली क्षमता, घरची परिस्थिती आणि आवड लक्षात घेवून करिअरची निवड करावी.
- भा. श्री. पुरंदरे, मुख्याध्यापक,
डीईएस रमणबाग शाळा

पुणे विभागीय शिक्षण मंडळाच्या समुपदेशकांचे क्रमांक

बी.डी.गरुड ८६००५२५९०८
पवनकुमार गायकवाड ९९२२४५३२३५
विनीत दरेकर ९४२२०८३८८६
सायली गायकवाड ९४०४२९४४००

Web Title: Remain enduring patience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.