राष्ट्रवादीचे बचेकुचे लोकही आमच्याकडे येतायत; खडसेंना काळजी नसावीचा भाजपाचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 04:02 PM2023-09-24T16:02:19+5:302023-09-24T16:07:15+5:30

आधी विरोधकांनी त्यांचे इंडिया आघाडी बद्दलचे काय आहे ते एकमत करावे. अजूनही इंडिया आघाडीचा नेता ठरलेला नाही. - महाजन

remaining leaders who belong to NCP are coming to us; BJP message that Khadse should not worry | राष्ट्रवादीचे बचेकुचे लोकही आमच्याकडे येतायत; खडसेंना काळजी नसावीचा भाजपाचा निरोप

राष्ट्रवादीचे बचेकुचे लोकही आमच्याकडे येतायत; खडसेंना काळजी नसावीचा भाजपाचा निरोप

googlenewsNext

एकीकडे शिंदे सेनेच्या पात्र-अपात्रतेवर हालचाली सुरु झालेल्या असताना आता राष्ट्रवादीतही हालचाली घडत आहेत. यामुळे एकनाथ खडसे यांनी आमची काळजी करू नये. त्यांचे राष्ट्रवादी बचे कूचे जे लोक आहेत ते सुद्धा आता आमच्याकडे येत आहेत, असा संदेश भाजपा नेते गिरीष महाजन यांनी दिला आहे. 

मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचा जो हेतू आहे त्यानुसार काम करावं, मात्र सरकारने आता शिंदे आयोग नेमला आहे, त्यांचे दररोज काम सुरू आहे. आता पुन्हा बैठक होत आहे, आणि जरांगे पाटील यांनी त्या बैठकीला आमंत्रित करण्यात आले. लवकर यावर सन्माननीय तोडगा हा निघेल, असे महाजन म्हणाले. 

आधी विरोधकांनी त्यांचे इंडिया आघाडी बद्दलचे काय आहे ते एकमत करावे. अजूनही इंडिया आघाडीचा नेता ठरलेला नाही. नेता ठरला की चारी बाजूने कशी घोडे पळतात तसे हे सर्व पळत सुटतील. काँग्रेसचे नेते असतील किंवा अन्य नेते हे सर्व शरद पवारांवर अदानी यांच्या भेटीबद्दल टीका करायला लागले आहेत. त्यामुळे त्यांनी आधी काय ते ठरवावे. काही दिवसांनी भाजपा महाशक्ती विश्वगुरू सुपर पॉवर होणार आहे, असा टोला महाजन यांनी हाणला आहे. 

संजय राऊत यांचे डोके तपासले पाहिजे. कुठे संजय राऊत, कुठे मोदी आणि कुठे संसद भवन. जगातली सर्वात मोठी वास्तू म्हणजे संसद भवन आहे. मात्र संजय राऊत यांचे मूर्खपणाचे प्रश्न आहेत. त्यांच्याकडून दुसरी काही अपेक्षा नाही. चंद्रावर गेले तरी चंद्रावर का गेले सूर्यावर का गेले नाहीत असे त्यांचे मूर्खपणाचे प्रश्न असतात. संजय राऊत यांच्या जिभेला हाड नाही, आम्ही त्यांना फार गांभीर्याने घेत नाही, अशी टीका महाजन यांनी केली. 

एकनाथ खडसे यांनी आमची काळजी करू नये. तुम्ही शरद पवार यांना घट्ट पकडून रहा. इकडे परत येण्य़ासाठी पुन्हा विनवण्या तसेच हातपाय जोडू नका. अजित दादा यांच्याबरोबर येण्यासाठी तुम्ही काय करत आहात, याची कल्पना आम्हाला तसेच अजित पवार यांना सुद्धा आहे. आमच्याकडे येण्यासाठी प्रयत्न करू नका, असा सल्ला महाजन यांनी दिला.
 

Web Title: remaining leaders who belong to NCP are coming to us; BJP message that Khadse should not worry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.