वाहून गेलेल्या ‘तवेरा’ कारचे अवशेष व दोन मृतदेह आढळले

By admin | Published: August 14, 2016 11:16 AM2016-08-14T11:16:33+5:302016-08-14T14:37:08+5:30

वाहून गेलेल्यांचा शोध घेणाऱ्या भारतीय नौदलाच्या जवानांना रविवारी कोसळलेल्या पूलापासून ३00 मिटर अंतरावर, एमएच 0४ जीडी ७८३७ या क्रमांकाच्या ‘तवेरा’ कारचे अवशेष सापडले.

The remains of the 'Tavera' car and two bodies were found | वाहून गेलेल्या ‘तवेरा’ कारचे अवशेष व दोन मृतदेह आढळले

वाहून गेलेल्या ‘तवेरा’ कारचे अवशेष व दोन मृतदेह आढळले

Next

महाड - तालुक्यातील सावित्री नदीवरील पूल कोसळल्याच्या घटनेला रविवारी १२ दिवस पूर्ण झाले. वाहून गेलेल्यांचा शोध घेणाऱ्या भारतीय नौदलाच्या जवानांना कोसळलेल्या पूलापासून ३00 मिटर अंतरावर, एमएच 0४ जीडी ७८३७ या क्रमांकाच्या ‘तवेरा’ कारचे अवशेष सापडले. ४ ते ५ मिटर पाण्याखाली सापडलेल्या या कारच्या अवशेषांबरोबरच दोन मृतदेह सापडल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाचे प्रमुख निवासी उपजिल्हाधिकारी सतिष बागल यांनी दिली. शोध पथकाला शनिवारी दुपारी दुसरी बस सापडली होती. 

 

Web Title: The remains of the 'Tavera' car and two bodies were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.