कुपोषित बालकांवर उपचार
By admin | Published: October 26, 2016 02:02 AM2016-10-26T02:02:06+5:302016-10-26T02:02:06+5:30
गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील कुपोषणाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. कुपोषणामुळे बालमृत्यूचा आलेख देखील वाढत आहे. या गंभीर परिस्थितीत राजकीय वातावरणही चांगलेच तापले.
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील कुपोषणाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. कुपोषणामुळे बालमृत्यूचा आलेख देखील वाढत आहे. या गंभीर परिस्थितीत राजकीय वातावरणही चांगलेच तापले. मात्र,
या चर्चेत पडण्याऐवजी
वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष
महाजन यांनी सोमवारपासून
जव्हार तालुक्यात विशेष सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी आढळून आलेल्या ५११ कुपोषित बालकांवर तत्काळ तिथेच उपचारदेखील सुरु करण्यात आले आहेत.
पालघर तालुक्यातील जव्हार-मोखाडासारख्या आदिवसी भागात कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. मुंबईपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर असूनही या ठिकाणी कुुपोषणाचा प्रश्न सुटलेला नाही. याविषयावर नेहमीच उलट-सुलट चर्चा सुरु असतात. गेल्या काही दिवसांपासून कुपोषणाचा प्रश्न चर्चेत आहे. पण, कुपोषणाच्या आकडेवारीत स्पष्टता यावी, ज्या कुपोषित बालकांना उपचारांची आवश्यकता आहे, त्यांना उपचार मिळावेत म्हणून ४ दिवसीय विशेष सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या सर्वेक्षणासाठी जे.जे. रुग्णालयातील १० बालरोग चिकित्सक आणि ५० इंटर्न डॉक्टर पालघर तालुक्यातील जव्हार येथे दाखल झाले आहेत.
गिरीष महाजन यांनी राज्यातील कुपोषणाला आळा घालण्यासाठी विशेष सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे. यामुळे कुपोषित बालकांचा शोध घेतला जाईल. त्यामुळे तिकडची परिस्थिती लक्षात येईल आणि त्यांच्यावर उपचार झाल्यास कुपोषणाची परिस्थिती नियंत्रणात येईल. त्यामुळे या मोहिमेला विशेष महत्त्व आहे. (प्रतिनिधी)
१३, ५६६ बालकांची तपासणी
जामसर येथील एकूण १३ हजार ५६६ बालकांची तपासणी करण्यात आली आहे. ही सर्व मुले ० ते १० वयोगटातील आहेत. २ हजार ४७५ लहान मुलांपैकी ३९२ मुलांना कुपोषणाची सुरुवात झाली असल्याचे आढळून आले. तर, १४६ मुले कुपोषित असल्याचे सर्वेक्षणात आढळले.
551 कुपोषित मुलांचे पाय सूज आली होती. या ५११ मुलांना तत्काळ तिकडच्या आरोग्य केंद्रात उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे. या मुलांवर उपचार करण्यासाठी जे.जे. रुग्णालयातून डॉक्टरांचे पथक तिकडे रवाना झाले असून तेथील आरोग्य केंद्रात ते मुलांवर उपचार करीत आहेत.
तत्काळ उपचार देण्याचे आदेश’ सोमवार, २४ आॅक्टोबरपासून जव्हार तालुक्यात कुपोषणाचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. सर्वेक्षणात वनवासी कल्याण आश्रम आणि अंगणवाडी सेविका मदत करणार आहेत. जव्हार तालुक्यातील जामसर येथे सोमवारी सर्वेक्षणाची सुरुवात करण्यात आली आहे. कुपोषणग्रस्त भागांमध्ये सर्वेक्षण करुन तत्काळ उपचार आणि आकडेवारी एकत्रित करण्याचे आदेश गिरीश महाजन यांनी दिले आहेत.
- डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय