उन्हाच्या तडाख्यातून दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2017 01:23 AM2017-04-23T01:23:20+5:302017-04-23T01:23:20+5:30
काही दिवसांपासून सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेतून राज्याला काहीसा दिलासा मिळाला असून, विदर्भाचा काही भाग वगळता कमाल तापमानात घट झाली आहे़ शनिवारी
पुणे : काही दिवसांपासून सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेतून राज्याला काहीसा दिलासा मिळाला असून, विदर्भाचा काही भाग वगळता कमाल तापमानात घट झाली आहे़ शनिवारी राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४५़२ अंश सेल्सिअस, तर सर्वांत कमी तापमान महाबळेश्वर येथे १७़९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़
देशभरातील पूर्व मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, विदर्भ येथील बहुतांशीठिकाणचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे आहे़ रायलसीमा, पश्चिम राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश येथील अनेक ठिकाणे तसेच आंध्र किनारपट्टी, ओडिशा, हरियाना, चंडीगड आणि दिल्ली येथील काही ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली आहे़
राज्याच्या अनेक शहरांत कमाल तापमानात घट झाली आहे.पुण्यातील कमाल तापमान ३५़६ अंशांपर्यंत खाली आले. या हंगामात सरासरीपेक्षा २ अंशांनी तापमान कमी होण्याची ही पहिलीच वेळ आहे़ (प्रतिनिधी)
प्रमुख शहरांमधील कमाल तापमान
पुणे ३५़६, अहमदनगर ४०़७, जळगाव ४०़२, कोल्हापूर ३५़४़, महाबळेश्वर ३०़८, मालेगाव ४०़२, नाशिक ३६, सांगली ३६़८, सातारा ३५़८, सोलापूर ३९़७, मुंबई ३३़८, अलिबाग ३३़८, रत्नागिरी ३२़२, डहाणू ३५़५, उस्मानाबाद ३८़७, औरंगाबाद ३८़४, परभणी ४०़८़, नांदेड ४२, उदगीर ३९़२, अकोला ४१, बुलडाणा ३८, चंद्रपूर ४५़२, गोंदिया ४४़३, नागपूर ४४़५, वर्धा ४३़५ व यवतमाळ ४१़