प्रणय करताना या आठ गोष्टी ठेवा लक्षात

By Admin | Published: April 25, 2017 10:58 PM2017-04-25T22:58:11+5:302017-04-25T22:58:11+5:30

आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या नात्यातील "तो" काळ नक्कीच आनंदी होईल.

Remember to keep these eight things while lovers | प्रणय करताना या आठ गोष्टी ठेवा लक्षात

प्रणय करताना या आठ गोष्टी ठेवा लक्षात

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - प्रणयावेळी भरपूर अशा गोष्टी असतात ज्या पुरुषाच्या जाणवतात. परंतु, त्याबद्दल ते कधीच बोलत नाही. यापाठीमागे भरपूर कारणे आहेत. कधी-कधी पुरुष लाजाळू स्वभावाचे असतात. सर्वात महत्वाचे म्हणजे त्या पुरुषाचे तुमच्यावर प्रेम असते. अशा वेळी तुमच्या चुकीच्या गोष्टी सांगून त्याला प्रणयाचा मुड खराब करायचा नसतो. तो फक्त तुमच्या चांगल्या गोष्टींची प्रशंसा करतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या नात्यातील "तो" काळ नक्कीच आनंदी होईल.

तुमची प्रतिक्रिया - पुरुषाने तुम्हाला स्पर्श केल्यानंतर तुमच्या प्रतिक्रियेकडे त्याचे खुप लक्ष असते. तुम्ही जर चांगला प्रतिसाद दिला तर त्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहान मिळते. त्यामुळे लक्षात ठेवा बेडवर असताना, प्रणय करताना तुमची प्रतिक्रिया त्याला अनुकूल असावी.

तुमच्या शरिराची हालचाल - तुमच्या शरिराची हालचाल ही विषयासक्त असावी. तुमचे संपुर्ण शरीर ज्यावेळेस या प्रक्रियेत असते त्यावेळेस ते पुरुषाला उत्तेजित करत असते. अशा वेळी न लाजता त्याच्यासोबत त्या क्षणाचा आनंद घ्या. लक्षात ठेवा तुमच्या शरिराची प्रत्येक हालचाल पुरुषाला आकर्षित करत असते.

पुढाकार घेणे - तुम्ही पुरुषासोबत आनंदात आहात हे तुमच्या उत्साहातून त्याला जाणवत असते. तुमची प्रत्येक प्रतिक्रिया हे तुमचे निस्वाःर्थ भावनेचे प्रतिक आहे. प्रणयावेळी जर तुम्ही पुढाकार घेतला तर पुरुषाचा आनंद द्विगुणीत होण्यास मदत होते.
सुरकुत्या आणि लठ्ठपणा - पुरुषाला तुमच्या शरिरावरच्या सुरुकुत्या आणि लठ्ठपणा जाणवत असतो, पण तो याबद्दल कधीच बोलत नाही. कारण त्याला तुमच्याविषयी सर्वच सुंदर वाटत असते आणि एक चांगला पुरुष कधीच या गोष्टींवरुन तुमच्याविषयी वाईट मत बनवत नाही.

अनावश्यक केस - पुरुषाला तुमच्या शरिरावरच्या अनावश्य केस लक्षात येतात. ते नेहमी ट्रिम केलेले असावे अशी त्याची इच्छा असते. या अनावश्यक केसांमुळे त्या भागाचा त्यांना वास येतो.

संवेदनशील स्पर्श - पुरुष ज्यावेळेस तुमच्या शरिराला स्पर्श करतो तेव्हा तुम्ही उत्तेजित होता, यातून त्याला आनंद मिळतो. त्यामुळे पुरुषाला पुन्हा-पुन्हा त्या जागी स्पर्श करायला आवडते. लक्षात ठेवा प्रेत्येक स्त्रीची संवेदनशील जागा वेगवेगळी असू शकते.
शरिराचा सैलपणा - बाळंतपणानंतर किव्हा वाढत्या वयोमानानुसार तुमच्या शरिरातील सैलपणा वाढतो. परंतु, व्यायाम केल्यानंतर शरीर पुन्हा पुर्ववत होण्यास मदत होते.

प्रणयानंतरच्या भावना - प्रणयानंतर तुम्ही कसे ऐकमेकांना जवळ घेता यावरुन तुमच्या भावना ऐकमेकांना जाणवत असतात. फक्त स्त्रीयांनाच नाही तर पुरुषांनाही ही गोष्ट जाणवते. यामुळे तुमचे नाते फुलण्यास मदत होते.

Web Title: Remember to keep these eight things while lovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.