सत्ता गेली की जात आठवते
By admin | Published: October 7, 2016 06:20 AM2016-10-07T06:20:02+5:302016-10-07T06:20:02+5:30
सत्तेवर असताना जे नेते आपल्या जातीचे काही भले करीत नाहीत त्यांना सत्ता गेल्यावर जातीची आठवण येते. केवळ सत्तेसाठी त्यांना जातीचा
मुंबई : सत्तेवर असताना जे नेते आपल्या जातीचे काही भले करीत नाहीत त्यांना सत्ता गेल्यावर जातीची आठवण येते. केवळ सत्तेसाठी त्यांना जातीचा पाठिंबा हवा असतो, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांवर टीका केली.
आरक्षण व इतर मागण्यांसाठी सध्या राज्यभर मराठा समाजाचे विशाल मोर्चे निघत आहेत. या मोर्चांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा पाठिंबा आहे. तसेच अनेक नेत्यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर गडकरी यांचे हे वक्तव्य आले आहे.
भाजपा प्रदेश कार्यसमिती बैठकीत बोलताना गडकरी म्हणाले, भाजपाची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला कोणतीही सामाजिक व आर्थिक विषमता नसलेला देश उभा करायचा आहे; जिथे कोणावरही आरक्षण मागायची वेळ
येणार नाही. (प्रतिनिधी)
रोजगाराची निर्मिती करणारे धोरण-
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे जन्मशताब्दी वर्ष हे गरीब कल्याण वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे.
रोजगाराची निर्मिती करणारे आर्थिक धोरण हे भाजपा सरकारचे वैशिष्ट्य असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
मुस्लीम आरक्षण अशक्य - दानवे : मराठा समाजापाठोपाठ आता मुस्लीम समाजातही आरक्षणासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. परंतु घटनेनुसार धर्माच्या आधारे कोणालाही आरक्षण देणे शक्य नसल्याचे सांगत भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील यांनी मुस्लीम आरक्षणाची मागणी फेटाळून लावली.