वनविभागाची अतिक्रमण हटाव मोहीम थंडावली
By admin | Published: October 20, 2014 11:17 PM2014-10-20T23:17:58+5:302014-10-21T00:41:46+5:30
दोन लाख हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण; केवळ २७ हजार हेक्टरवर कारवाई!
नीलेश शहाकार/बुलडाणा
गत तीन वर्षात वनजमिनींवरील अतिक्रमण राज्यात झपाट्याने वाढले असून, त्या तुलनेत वन विभागाकडून अतिक्रमणे हटविण्याची कारवाई मंदावल्याने अतिक्रमकांचे फावले आहे. वनहक्क कायद्याचा फायदा लाटण्यासाठी वनजमीन बळकावणार्या टोळ्या राज्यात कार्यरत झाल्या असून, त्यामुळे वनजमिनीवरील अतिक्रमण २ लाख २४ हजार हेक्टरपर्यंत पोहोचले आहे.
अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत जंगलवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम २00६ च्या अंतर्गत आदिवासींना कसण्यासाठी वनजमीन उपलब्ध करून देण्याचे धोरण शासनाकडून आखण्यात आले; मात्र याचा गैरफायदा घेत, वनजमिनींवर अतिक्रमण करण्याचे प्रमाण वाढले. दुसरीकडे वनहक्क कायद्यांतर्गत केलेल्या कारवायांचे दावे तपासण्याची कारवाई क्षेत्र पातळीवर संथगतीने सुरू असल्याने त्याचा परिणाम अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईवर झाला. त्यामुळे वनजमिनीवरील अतिक्रमण फोफावले.
वन विभागाच्या आकडेवारीनुसार, २0११-१२ साली ८४ हजार हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण होते. त्याच वर्षी ३ हजार ३६९ हेक्टरवर पुन्हा अतिक्रमण वाढले. हे प्रमाण झपाट्याने वाढून, यावर्षी तब्बल १६ हजार हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण करण्यात आले. २0१३-१४ साली ५ हजार १५२ हेक्टर क्षेत्रात नव्याने अतिक्रमण करण्यात आले. अतिक्रमणाचे क्षेत्र वाढत असताना अतिक्रमणे काढण्याची गती मात्र अतिशय कमी आहे. सध्या वनजमिनींवरील अतिक्रमणाचे क्षेत्र २ लाख २४ हजार १८३ हेक्टरपर्यंत पोहोचले आहे.
*राज्यातील वनजमिनीवर झालेले अतिक्रमण (हेक्टरमध्ये)
वर्ष अतिक्रमण हटविलेले शिल्लक
२0११-१२ ८८१४२.३८0 १९२९.१८0 ८६२१३.२00
२0१२-१३ ८७८२९.५३९ १७७४९.३९३ ७00८0.१४५
२0१३-१४ ७५२३२.७९९ ७३४२.४१८ ६७८९0.३८१