‘नौकानयन मार्गातील गाळ काढणार’
By admin | Published: April 6, 2017 05:44 AM2017-04-06T05:44:37+5:302017-04-06T05:44:37+5:30
केंद्र शासनाच्या सागरमाला प्रकल्पातून खाडीतील नौकानयन मार्गातील गाळ काढण्यात येईल
मुंबई : केंद्र शासनाच्या सागरमाला प्रकल्पातून खाडीतील नौकानयन मार्गातील गाळ काढण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले.
आ. मनीषा चौधरी यांनी सातपाटी (दहिसर) खाडीतील नौकानयन मार्गातील गाळ काढण्यासंदर्भात उपस्थित प्रश्नाला उत्तर देताना येथील गाळ उपशाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच केंद्राच्या सागरमाला प्रकल्पातून बंदर उभारणीची कामे सुरू करण्यात आली आहेत. ड्रेझिंग कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या माध्यमातून गाळ काढण्याचे धोरण स्वीकारण्यात येईल, त्यासाठी केंद्राचे सहकार्य घेतले जाईल, असेही त्यांनी पुढे सांगितले (विशेष प्रतिनिधी)