आता काढा ‘स्मार्ट’ रांगोळी

By Admin | Published: October 7, 2016 07:00 PM2016-10-07T19:00:26+5:302016-10-07T19:00:26+5:30

गणेशोत्सव संपताच दसरा आणि दिवाळीेचे वेध लागतात. नवरात्रोत्सवाला सुरुवात झाल्यापासून दिवाळीच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्वत्र धामधूम सुरू असते.

Remove now 'Smart' Rangoli | आता काढा ‘स्मार्ट’ रांगोळी

आता काढा ‘स्मार्ट’ रांगोळी

googlenewsNext

- स्वप्निल जोशी, आॅनलाइन लोकमत

गणेशोत्सव संपताच दसरा आणि दिवाळीेचे वेध लागतात. नवरात्रोत्सवाला सुरुवात झाल्यापासून दिवाळीच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्वत्र धामधूम सुरू असते. नवीन कपड्यांबरोबरच नवनवीन वस्तूंची खरेदी, घराची साफसफाई, सजावट, फराळ आणि मिठाई बनविण्याची लगबग प्रत्येक घरात बघायला मिळते. सणाचा आनंद साजरा करतानाच रांगोळी रेखाटनाचाही वेगळा आनंद महिला लुटताना दिसतात.
दिवाळीमध्ये प्रत्येक घरासमोर सकाळी आणि संध्याकाळी विविध रंगांनी आणि नक्षींनी साकारलेल्या रांगोळ्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. कुणी ठिपक्यांची रांगोळी, तर कुणी आकर्षक सजीव चित्रे रेखाटताना दिसतात. उत्सवाचे प्रतीक म्हणून रांगोळीकडे बघितले जाते, त्यामुळे आपली रांगोळी आकर्षक दिसावी यासाठी महिला विशेष प्रयत्न करताना दिसतात. रांगोळीसाठी बाजारात अनेक पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अलीकडे तर अनेक महिला गूगल सर्च इंजिनवर रांगोळीच्या डिझाइन शोधत असतात. परंतु यंदाच्या दिवाळीत रांगोळीची पुस्तके किंवा गूगल सर्च करण्याची आवश्यकता नाही. गूगल प्ले स्टोअरवर विविध रांगोळीचे अ‍ॅप उपलब्ध असून हे रांगोळीचे अ‍ॅप डाउनलोड करून विविध रांगोळीच्या कल्पना उपलब्ध होणार आहे.
रांगोळी अ‍ॅपमध्ये ठिपक्यांच्या रांगोळीसह दिवाळी रांगोळी, गणेश रांगोळी, बंगाली रांगोळी, हृदयकमलम्, संक्रांती रथम्, सरस्वती, तुलसी, नवग्रह अशा विविध प्रकारातील रांगोळ्या अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहेत. नुसतेच रांगोळीचे आकार किंवा नक्षी यापुरते मर्यादित न राहता रांगोळी कशी काढायला हवी, रांगोळीत रंग कसे भरायचे याचे वेगवेगळ्या टप्प्यात मार्गदर्शन दाखविण्यात आले आहे. त्यामुळे एखादी अवघड आणि क्लिष्ट वाटणारी रांगोळी अगदी सहजपणे रेखाटता येते. गूगल प्ले स्टोअरवर रांगोळी डिझाइन्स, आदर्श मोबाइल रांगोळी अ‍ॅप, व्हाइट क्लाउड्स रंगोली गॅलरी, संकेतिका सिंपल रंगोली डिझाइन्स, विकल्प रांगोळी असे विविध अ‍ॅप उपलब्ध आहेत. गूगल प्ले स्टोअरवर अनेक अ‍ॅप्स उपलब्ध असून, यातील काही अ‍ॅप इंटरनेट विना (आॅफलाईन) वापरता येत असल्याने यासाठी डाटा खर्च होत नाही.

Web Title: Remove now 'Smart' Rangoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.