...तर दहीहंडीसाठी विशेष अध्यादेश काढणार

By admin | Published: July 6, 2017 05:40 PM2017-07-06T17:40:44+5:302017-07-06T17:46:50+5:30

राज्यात यावर्षी दहीहंडी उत्साहात साजरी होण्याची चिन्हं आहेत. कारण दहीहंडीपर्यंत कोर्टाने घातलेल्या नियमांमध्ये बदल न झाल्यास

... to remove a special ordinance for dahihindi | ...तर दहीहंडीसाठी विशेष अध्यादेश काढणार

...तर दहीहंडीसाठी विशेष अध्यादेश काढणार

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - राज्यात यावर्षी दहीहंडी उत्साहात साजरी होण्याची चिन्हं आहेत. कारण दहीहंडीपर्यंत कोर्टाने घातलेल्या नियमांमध्ये बदल न झाल्यास राज्य सरकारकडून विशेष अध्यादेश काढला जाणार आहे.  मुंबईचे भाजपाध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रशासकीय अधिकारी, आयुक्त आणि अधिवक्ता यांची गणेशोत्सव, दहीहंडी संदर्भात बैठक झाली त्यानंतर शेलार यांनी ही माहिती दिली. 
 
महाराष्ट्राची ओळख असलेले दहीहंडी आणि गणेशोत्सव हे दोन्ही सण उत्साहात साजके व्हावे यासाठी मुख्यमंत्र्यांची भूमिका सकारात्मक आहे, यावर्षी दोन्ही सण साजरे होताना कायदेशीरबाबी अडचणीच्या ठरल्यास आवश्यकता भासल्यास अद्यादेश काढावा अशी मागणी मी केली त्याबाबतही सरकार सकारात्मक आहे असं ट्विट शेलार यांनी केलं.  
 
 
दहीहंडी मंडळाची बाजू सुप्रीम कोर्टात मांडण्यासाठी राज्य सरकार विशेष कौन्सिल तुषार मेहता यांची नेमणूक करणार आहे. गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाच्या अटींच्या कायद्यात बदल करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. पारंपारिक सण हे साजरे होतीलच. त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या देण्यात याव्यात, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
 (दहीहंडी पाहण्याच्या मोहात गाठले रुग्णालय)
(दहीहंडी आता साहसी खेळ)
(यंदाही दहीहंडी मैदानातच फुटणार!)

Web Title: ... to remove a special ordinance for dahihindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.