एका फोनमध्ये ताण-तणाव, गैरसमजुती दूर करा
By admin | Published: February 21, 2017 12:36 AM2017-02-21T00:36:58+5:302017-02-21T00:36:58+5:30
बोर्डाचा उपक्रम : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष समुपदेशकांची केली नियुक्ती
कोल्हापूर : दहावी व बारावी परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थी गैरसमजुती, ताण-तणावाखाली जातात. यावेळी विद्यार्थ्यांचे
मनोधैर्य वाढविण्यासाठी मंडळाच्या कोल्हापूर विभागाने जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती प्र. विभागीय सचिव व्ही. पी. कानवडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीची परीक्षा दि. २८ पासून, तर दहावीची परीक्षा ७ मार्चपासून सुरू होत आहेत. परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना, पालकांना केव्हाही मदतीची आवश्यकता भासल्यास शंका निरसनासाठी विद्यार्थी, पालकांनी समुपदेशकांशी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. ही सेवा २८ फेब्रुवारी ते १ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे तरी या सेवेचा लाभ विद्यार्थी व पालकांनी घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
यासह मंडळाच्या कार्यालयातही हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक ०२३१-२६९६१०१,०२,०३ यावर सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध केली आहे.
जिल्हानिहाय समुपदेशक असे...
कोल्हापूर : शशिकांत कापसे (मो. नं. ९१७५८८०००८), एस. एस. कोंडेकर (मो. नं. ९४२११०९७२१), रवींद्र पायमल (मो. नं. ९८२२३०७१४१), टी. आर. मोरे (मो. नं. ९४२०३५३४३०)
सातारा : अंकुश डांगे (मो. नं. ९८२२२२००४१), पी. एस. पवार (मो. नं. ९४२३८०४२४९), सचिन नलवडे (मो. नं. ९७६६९२२६०५)
सांगली : एन. ए. पाटील (मो. नं.९६६५३०८००८), नेहा वाटवे (मो. नं.९८५००५७६३०), एन. डी. बिरनाळे (मो. नं.९३७१४७४९९०, ८८८८४७५५५२)