अर्थखात्याची श्वेतपत्रिका काढणार

By admin | Published: December 13, 2014 02:31 AM2014-12-13T02:31:58+5:302014-12-13T02:31:58+5:30

राज्य शासनाकडून अर्थखात्याची श्वेतपत्रिका काढण्यात येणार असल्याचे राज्य शासनाने मान्य केले आहे. यासंदर्भात माणिकराव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

To remove the whitepaper of the economy | अर्थखात्याची श्वेतपत्रिका काढणार

अर्थखात्याची श्वेतपत्रिका काढणार

Next
नागपूर : राज्य शासनाकडून अर्थखात्याची श्वेतपत्रिका काढण्यात येणार असल्याचे राज्य शासनाने मान्य केले आहे. यासंदर्भात माणिकराव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली.
राज्याची सध्याची आर्थिक स्थिती, स्वीकृत दायित्वे, भविष्यातील वाटचाल आणि खर्चात पारदर्शकता आणण्यासाठी उपाययोजना विषद करणारी श्वेतपत्रिका शासनाकडून काढण्यात येईल असे विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनादरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये घोषित करण्यात आले होते. ही श्वेतपत्रिका कधी काढायची हे स्पष्ट नसले तरी यासंदर्भात माहिती एकत्रित करण्याचे काम सुरू आहे असे उत्तरात नमूद करण्यात आले आहे.
अंगणवाडी सेविकांची साडेतीन हजार पदे रिक्त
राज्यात अंगणवाडी सेविकांची सुमारे साडेतीन हजार पदे रिक्त असल्याची माहिती शासनातर्फे देण्यात आली. यासंदर्भात डॉ.सुधीर तांबे, विक्रम काळे, संजय दत्त व भाई जगताप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याच्या लेखी उत्तरादरम्यान महिला व बालविकास मंत्री पंकज मुंडे यांनी ही माहिती दिली.ऑगस्ट 2क्14 च्या मासिक प्रगती अहवालानुसार अंगणवाडी सेविकांची 2 हजार 25क् व मिनी अंगणवाडी सेविकांची 1 हजार 257 पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्याबाबत वेळोवेळी आदेश देण्यात आले आहेत. भरतीप्रक्रिया गुणवत्तेच्या आधारावर करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत.
 
ग्रामपंचायती ‘हायटेक’ करण्याची प्रक्रिया सुरू
राष्ट्रीय विकास योजनेअंतर्गत राज्यातील ग्रामपंचायती ‘ब्रॉडबॅन्ड कनेक्टिव्हिटी’शी जोडण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती राज्य शासनाने दिली. अब्दुल्लाखान दुर्राणी, अमरसिंह पंडित, सतीश चव्हाण यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी लेखी उत्तरात वरील माहिती दिली.
या योजनेअंतर्गत राज्यातील 28 हजार 6 ग्रामपंचायती जोडल्या जाणार आहेत. यासंदर्भात केंद्र, राज्य शासन आणि बीएसएनएलमध्ये सामंजस्य करार झाला आहे. पहिल्या टप्प्यात 11 हजार 52क् ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ‘ऑप्टिकल फायबर नेटवर्क’ टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले.
 
शिकारप्रकरणी राज्यात 
49 आरोपींना अटक
चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात वाघ तसेच इतर वन्यप्राण्यांची शिकार करणा:या 49 आरोपींना अटक करण्यात आली आहे. शोभाताई फडणवीस यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. 
यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती आहे. वाघ शिकारप्रकरणी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी गठित केलेल्या सूकाणू समितीच्या देखरेखीत चौकशी पथकाने तपास काम पूर्ण केले आहे. 9 वनगुन्ह्यांप्रकरणी राज्यातील 21 तर परराज्यातील 28 आरोपींना अटक करण्यात आली . यातील तीन गुन्हेगारांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठविण्यात आली.(प्रतिनिधी)
 

 

Web Title: To remove the whitepaper of the economy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.