मोबाईलमधून काढा घरबसल्या तिकीट

By admin | Published: January 25, 2017 03:29 AM2017-01-25T03:29:46+5:302017-01-25T03:29:46+5:30

जीपीएस प्रणालीत येणारा तांत्रिक अडथळ््यामुळे पेपरलेस मोबाईल तिकीट मिळवताना मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता.

Removed home from home | मोबाईलमधून काढा घरबसल्या तिकीट

मोबाईलमधून काढा घरबसल्या तिकीट

Next

मुंबई : जीपीएस प्रणालीत येणारा तांत्रिक अडथळ््यामुळे पेपरलेस मोबाईल तिकीट मिळवताना मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता. यातून सुटका करण्यासाठी रेल्वेच्या क्रिस (सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन) संस्थेकडून मोबाईल तिकीट सेवेत छापील प्रतचा पर्याय देण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावरील सर्व स्थानकांवर २५ जानेवारीपासून केली जात असल्याची माहिती देण्यात आली. यात एटीव्हीएममधून प्रवाशांना तिकीटाची छापील प्रत घेता येईल. महत्वाची बाब म्हणजे ही सेवा घेताना जीपीएस गरजेचे नसल्याने घरबसल्याही तिकीट प्रवाशांना काढता येईल आणि त्यानंतर स्थानकात जाऊन छापील प्रत घेता येईल.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते २0१५ च्या डिसेंबर महिन्यात मोबाईल तिकीट सेवा सुरु करताना ‘युटीएस आॅन मोबाईल’हे अ‍ॅप उपलब्ध केले गेले. सुरुवातीला ‘छापील प्रत’ची सुविधा होती. मात्र ही सेवा बंद करुन पेपरलेसचा पर्याय देण्यात आला. त्याचप्रमाणे युटीएस आॅन मोबाईल अ‍ॅपमधून तिकीट काढण्यासाठी रेल्वेच्या हद्दीपासून ३0 मीटर लांब जाण्याची आवश्यकता होती. तिकिटासाठी जीपीएसला सिग्नलच मिळत नसल्याने प्रवाशांचा तिकीट काढताना बराच वेळ जात होता. त्यामुळे क्रिसकडून छापील प्रतचा पर्यायच पेपरलेस मोबाईल तिकीट सेवेत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्मार्ट फोनवरुन तिकीट काढल्यावर मोबाईल आणि संकेतक्रमांक प्रवाशाला मिळेल. हा क्रमांक स्थानकातील एटीव्हीएम मशिनमध्ये टाकल्यावर तिकीटाची छापील प्रत घेता येईल. सर्व स्थानकात त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती क्रिसच्या मुंबई विभागाचे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी दिली. या नवीन सेवेसाठी मोबाईलला फक्त नेटवर्क असल्यास तिकीट काढू शकता. त्यामुळे रेल्वेच्या हद्दीपासून ३0 मीटर अंतराची अट पेपरलेस सेवेशिवाय या दुसऱ्या पर्यायासाठी नसेल, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Removed home from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.