अहमदनगरचं अहिल्यानगर नामांतर करा; गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 10:55 AM2022-06-02T10:55:21+5:302022-06-02T11:01:37+5:30

शरदच्रंद्र पवार यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लॉन्च करण्याचा इव्हेंट वाटतो असं पडळकरांनी टीका केली आहे.

Rename Ahmednagar to Ahilyanagar; Gopichand Padalkar's letter to CM Uddhav Thackeray | अहमदनगरचं अहिल्यानगर नामांतर करा; गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

अहमदनगरचं अहिल्यानगर नामांतर करा; गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

Next

मुंबई - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी येथे झालेल्या शरद पवार आणि गोपीचंद पडळकर यांच्या राजकीय संघर्षाचा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना चौंडीच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी रोखलं त्यानंतर पडळकर यांनी शरद पवारांवर घणाघात केला. त्यानंतर आता भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्याची मागणी केली आहे. 

गोपीचंद पडळकर(BJP Gopichand Padalkar) यांनी पत्रात म्हटलंय की, नुकत्याच पार पडलेल्या चौंडी अहमदनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये पवार आजोबा-नातवाच्या मुघलशाहीने पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून जाण्यास रोखलं. शेकडो हिंदूंनी जीव गमावलेल्या मुंबई बॉम्बब्लास्टचा सूत्रधार दाऊद इब्राहिमच्या बहिणीसोबत आर्थिक भागीदार नवाब मलिक यांचे पालनकर्ते मा. शरदच्रंद्र पवार यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लॉन्च करण्याचा इव्हेंट वाटतो अशी टीका पडळकरांनी केली आहे.  

तसेच हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संपूर्ण हिंदुस्थानाच्या प्रेरणास्थान आहेत. जेव्हा हिंदूस्थानात मुसलमानी राजवटीत हिंदु संस्कृती मंदिरे, लुटली आणि तोडली जात होती त्यावेळेस अहिल्यामातेने या हिंदुसंस्कृतीत प्राण फुंकले त्यांचा जीर्णोद्धार केला. हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म त्या जिल्ह्याचे अहमदनगर नाव बदलून अहिल्यानगर करण्यात यावे अशी अहिल्याप्रेमींची लोकभावना असल्याचं पडळकरांनी पत्रात म्हटलं आहे. 

दरम्यान, आपण आता कोणत्या इतिहासाचा वारसा सांगणार आहात? मुघलशाही की होळकरशाही? अहिल्यानगर नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल ही अपेक्षा. अन्यथा हा बहुजन जागा झालाय आणि संघटीत झालाय हे लक्षात ठेवा अशा शब्दात आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे. औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव आणि आता त्यानंतर  पडळकर यांनी अहमदनगरचं अहिल्यानगर नाव करावं ही मागणी केल्यानं महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी भाजपाने केली आहे. 

Web Title: Rename Ahmednagar to Ahilyanagar; Gopichand Padalkar's letter to CM Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.