विख्यात उद्योजक डी.एस.कुलकर्णी कार अपघातात जखमी, चालकाचा मृत्यू

By admin | Published: May 26, 2016 01:14 AM2016-05-26T01:14:46+5:302016-05-26T13:10:14+5:30

प्रसिद्ध उद्योजक डी एस कुलकर्णी यांच्या गाडीची कंटेनरला धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात डी.एस.कुलकर्णी जखमी झाले असून त्यांचा चालक ठार झाला आहे.

Renowned industrialist DS Kulkarni injured in a car accident, driver dies | विख्यात उद्योजक डी.एस.कुलकर्णी कार अपघातात जखमी, चालकाचा मृत्यू

विख्यात उद्योजक डी.एस.कुलकर्णी कार अपघातात जखमी, चालकाचा मृत्यू

Next
पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व पुण्याच्या डीएसके विश्व उद्योगसमूहाचे संस्थापक अध्यक्ष डी एस कुलकर्णी यांच्या गाडीची कंटेनरला धडक बसून झालेल्या अपघातात डी.एस.कुलकर्णी गंभीर जखमी झाले असून त्यांचा चालक जागीच ठार झाला आहे.  मोटारीत चालकाशेजारी बसलेले किरण काटे हे मात्र अपघातातून सुखरूप बचावले. त्यांच्यावर लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  डी. एस. कुलकर्णी यांना तातडीने निगडीच्या लोकमान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांच्या डाव्या बाजूच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे असे लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ. जयंत श्रीखंडे यांनी सांगितले. बुधवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक सखाराम कुलकर्णी तथा डी एस कुलकर्णी हे त्यांचे सहकारी किरण पांडुरंग काते ( वय 32) आणि निरंजन कापसिंग यांच्यासह मुंबईकडे जात होते. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा एक्झीट जवळील उतारावर मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणार्‍या एका टँकरने समोर जाणार्‍या ४ वाहनांना धडक दिली व तो मुंबई पुणे लेनवर विरुद्ध दिशेने रस्ता दुभाजक ओलांडून डी.एस.कुलकर्णी यांच्या लँड क्रूझर मोटारीला धडकला. 
या अपघातात डी.एस.कुलकर्णी जखमी झाले तर  नीरज रामकरण सिंग (वय 37, रा. गणेशनगर बोपखेल) हा त्यांचा कारचालक जागीच ठार झाला. 
डी.एस. कुलकर्णी हे त्यांच्या लँड क्रूझर मोटारने मुंबईहून पुण्याकडे येत असताना खंडाळा बोगदा पार करून त्यांची मोटार खंडाळा एक्झिटजवळ आली असताना हा भीषण अपघात झाला. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या एका टँकरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो टँकर रस्तता दुभाजक ओलांडून डीएसके यांच्या मोटारीवर प्रचंड वेगाने आदळला. डीएसकेंच्या चालकाने मोटार वळवून धडक टाळण्याचा प्रयत्न केला, मात्र टँकर वेगात असल्याने त्याला यश आले नाही.
दरम्यान डी.एस.कुलकर्णी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून पुढील उपचारांसाठी त्यांना निगडीतील लोकमान्य रुग्णालयातून पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 
 

 

Web Title: Renowned industrialist DS Kulkarni injured in a car accident, driver dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.