‘शिवनेरी’चे भाडे वाढणार

By admin | Published: March 22, 2016 03:37 AM2016-03-22T03:37:14+5:302016-03-22T03:37:14+5:30

केंद्रीय अर्थसंकल्पात सेवा कर वाढवितानाच एसी बससेवांवरही हा कर प्रथमच लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एसटीच्या शिवनेरी एसी बसच्या भाड्यातही वाढ होईल

Rent of 'Shivneri' will increase | ‘शिवनेरी’चे भाडे वाढणार

‘शिवनेरी’चे भाडे वाढणार

Next

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पात सेवा कर वाढवितानाच एसी बससेवांवरही हा कर प्रथमच लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एसटीच्या शिवनेरी एसी बसच्या भाड्यातही वाढ होईल, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली. जून महिन्यापासून ही वाढ लागू होईल.
केंद्राच्या २0१६-१७ च्या अर्थसंकल्पात सेवा करात वाढ करण्यात आल्याने तो १५ टक्क्यांपर्यंत गेला. आधीच प्रवासी भारमान कमी असल्याने, त्यात सेवा कराची भर पडल्यास भारमान आणखी कमी होईल, अशी भीती एसटीला आहे. एसटीच्या ताफ्यात टप्याटप्यात ५00 गाड्यांच्या भर पडणार असून, त्यात एसी बसेसही आहेत. त्यातही ही वाढ असेल, अशी माहिती देण्यात आली.
दरम्यान, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजिंतसिंह देओल यांनी सांगितले की, ‘सेवा कर एसटीच्या एसी बस सेवांवर १ जूनपासून लागू होईल. सेवा कर जरी १५ टक्के असला, तरी तो पूर्ण लागू करायचा की, अन्य प्रकारे कमी प्रमाणात लागू करावा, यावर विचार होत आहे.’ (प्रतिनिधी)

Web Title: Rent of 'Shivneri' will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.