अवयव प्रत्यारोपण सल्लागार समितीची पुनर्रचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 04:15 AM2017-12-23T04:15:48+5:302017-12-23T04:15:56+5:30
राज्य सल्लागार समितीचा दोन वर्षांचा कालावधी संपुष्टात आला आला असून, समितीची पुनर्रचना करण्याची बाब विचाराधीन होती. त्यानुसार, मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा, १९९४ अंतर्गत राज्य सल्लागार समितीची पुनर्रचना केली आहे.
मुंबई : राज्य सल्लागार समितीचा दोन वर्षांचा कालावधी संपुष्टात आला आला असून, समितीची पुनर्रचना करण्याची बाब विचाराधीन होती. त्यानुसार, मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा, १९९४ अंतर्गत राज्य सल्लागार समितीची पुनर्रचना केली आहे.
अध्यक्ष म्हणून आरोग्य व कुटुंब कल्याणचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सदस्य सचिव म्हणून आरोग्य सेवा संचालनालयाचे आरोग्य सेवा संचालकांचा समावेश आहे. सदस्य म्हणून एच.एन. रिलायन्स हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जी.बी. डावर, के.ई.एम युरॉलॉजीच्या विभागप्रमुख डॉ. सुजाता पटवर्धन, दिशा फाऊंडेशनचे शैलेश शेट्टी, स्नेहा फाऊंडेशनचे डॉ. अरमेडा फर्नांडिस, विधी व न्याय विभागाचे सहसचिव रा.द. सांवत, डॉ. अलेन अलमेडा, डॉ. सुरेंद्रकुमार माथुर, डॉ. अन्वय मुळे यांंचा समावेश आहे.