दरदिवशी १२,५०० ATM मशीनमध्ये सुरु आहे दुरुस्ती

By admin | Published: November 17, 2016 09:06 AM2016-11-17T09:06:44+5:302016-11-17T09:35:52+5:30

५०० आणि २ हजार रुपयांच्या नव्या नोटांच्या आकारमानानुसार एटीएम मशीन्समध्ये बदल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

Repairs on 12,500 ATM machines every day | दरदिवशी १२,५०० ATM मशीनमध्ये सुरु आहे दुरुस्ती

दरदिवशी १२,५०० ATM मशीनमध्ये सुरु आहे दुरुस्ती

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १७ - ५०० आणि २ हजार रुपयांच्या नव्या नोटांच्या आकारमानानुसार एटीएम मशीन्समध्ये बदल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. दरदिवसाला १२,५०० एटीएम मशीन्समध्ये नव्या नोटांच्या आकारानुसार बदल करण्यात येत आहेत. या बदलांमुळे ५०० आणि २ हजारच्या नोटा अधिक वेगाने ग्राहकांपर्यंत पोहोचतील. जेणेकरुन बँकांमध्ये उसळणारी गर्दी कमी होईल. 
 
देशभरात एकूण २ लाख एटीएम मशीन्स आहेत. पण नव्या नोटा देण्यास या मशीन्स सज्ज नसल्याने बँकांबाहेर रांगा लागत आहेत. सध्या या मशीन्समधून फक्त १०० रुपयांच्या नोटा मिळतात. देशातील सर्व एटीएम्स पूर्ण क्षमतेने काम करायला अजून दोन आठवडे लागतील. 
 
सध्या बँकिंग व्यवहारांवर काही निर्बंध आहे. एटीएम पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यानंतर पैसे काढण्यासाठीची मर्यादाही सरकारला वाढवता येईल. बँकांपर्यंत कॅश पुरवठा वाढवण्यासाठी तसेच रांगेतील लोकांचा वेळ कमी व्हावा यासाठी सरकारकडून अनेक उपायोजना केल्या जात आहेत. जुन्या नोटा बदलणे, पैसे काढणे आणि जमा करणे यामुळे दररोज बँकांबाहेर रांगा लागत आहेत. संपूर्ण देशामध्ये हेच चित्र आहे. 
 

Web Title: Repairs on 12,500 ATM machines every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.