महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द, १०० रुपयात आनंदाचा शिधा; मंत्रिमंडळाचे ९ निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 02:23 PM2023-08-18T14:23:55+5:302023-08-18T14:25:37+5:30

केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम घेण्यात येईल.

Repeal of Maharashtra Casino Act, Rs 100 ration of happiness; 9 Decisions of the Cabinet in Maharashtra | महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द, १०० रुपयात आनंदाचा शिधा; मंत्रिमंडळाचे ९ निर्णय

महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द, १०० रुपयात आनंदाचा शिधा; मंत्रिमंडळाचे ९ निर्णय

googlenewsNext

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयात पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात प्रामुख्याने १०० रुपयांत आनंदाचा शिधा, कॅसिनो कायदा रद्द, रस्ते जोड योजना प्रकल्प यासारख्या निर्णयांचा समावेश आहे.

मंत्रिमंडळाने घेतलेले ९ महत्त्वाचे निर्णय(संक्षिप्त स्वरुपात)

  1. राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार . भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार. ५ हजार कोटीचा प्रस्ताव (आदिवासी विकास विभाग)
  2. गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा. प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असा शिधा (अन्न व नागरी पुरवठा)
  3. आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात भरीव वाढ. आता दरमहा ५०० रुपये मिळणार (कौशल्य विकास )
  4. मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी ( महसूल विभाग)
  5. महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द (गृह विभाग )
  6. केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम. राज्याचा हिस्सा वाढला (महिला व बाल विकास)
  7. सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा २०२३ चा अध्यादेश मागे ( सहकार विभाग )
  8. दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन (विधी व न्याय विभाग )
  9. मंडणगड येथे दिवाणी न्यायालय (विधी व न्याय विभाग)

 

Web Title: Repeal of Maharashtra Casino Act, Rs 100 ration of happiness; 9 Decisions of the Cabinet in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.