‘१० लाख ३७ हजार नादुरुस्त वीजमीटर बदला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 03:51 AM2018-04-07T03:51:55+5:302018-04-07T03:51:55+5:30

- राज्यातील सुमारे १० लाख ३७ हजार सिंगल फेजचे नादुरुस्त वीजमीटर येत्या महिन्याभरात बदलावेत. हे मीटर बदलताना त्याची जागेवरच मीटर क्रमांकासह मोबाइल अ‍ॅपद्वारे संगणकीय प्रणालीत नोंद करण्यात यावी, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिले.

 Replace '10 Lacks 37 thousand illiterate electricity meters' | ‘१० लाख ३७ हजार नादुरुस्त वीजमीटर बदला’

‘१० लाख ३७ हजार नादुरुस्त वीजमीटर बदला’

googlenewsNext

मुंबई - राज्यातील सुमारे १० लाख ३७ हजार सिंगल फेजचे नादुरुस्त वीजमीटर येत्या महिन्याभरात बदलावेत. हे मीटर बदलताना त्याची जागेवरच मीटर क्रमांकासह मोबाइल अ‍ॅपद्वारे संगणकीय प्रणालीत नोंद करण्यात यावी, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिले. राज्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबई मुख्यालयात आयोजित मुख्य अभियंत्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
संजीव कुमार म्हणाले, अचूक बिलिंगसाठी विशेषत्वाने प्रयत्न सुरू आहेत. नवीन वीजजोडणीसह नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना पुरेसे नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सिंगल फेजचे आणखी ३० लाख नवीन वीजमीटर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नादुरुस्त आढळून आलेले १० लाख ३७ हजार सिंगल फेजचे वीजमीटर सर्वप्रथम एक महिन्याच्या कालावधीत बदलण्यात यावेत. त्यानंतर नादुरुस्त असलेले सिंगल फेजचे एकही वीजमीटर ग्राहकाकडे राहणार नाही याप्रमाणे कार्यवाही करावी.
तसेच यापुढे ग्राहकांच्या तक्रारीनुसार किंवा महावितरणच्या पर्यवेक्षणात नादुरुस्त आढळून येणारे वीजमीटर त्वरित बदलण्याची काळजी घ्यावी.

महावितरणकडून मीटर रीडिंग मोबाइल अ‍ॅपद्वारे सुरू असल्याने बिलिंग प्रणालीत पारदर्शकता आलेली आहे. गतिमानता आली आहे. परंतु मीटर रीडिंग एजन्सीजकडून अद्यापही सदोष मीटर रीडिंग घेण्याचे प्रकार दिसून येत आहेत. परिणामी ग्राहकांना वीजबिल दुरुस्तीचा त्रास होत आहे. मनस्ताप सहन करावा लागत आहे. सोबतच महावितरणच्या महसुलाचे नुकसान होत आहे. असे सदोष रीडिंगचे प्रकार टाळण्यासाठी व बिलिंगमध्ये अचूकता आणण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी स्थानिक उपाययोजना कराव्यात.

महावितरणची
परिमंडळे : १६
एकूण सिंगल फेज नादुरुस्त वीजमीटर :
१० लाख ३७ हजार
औरंगाबाद प्रादेशिक विभाग :
१ लाख ८५ हजार
नागपूर प्रादेशिक विभाग : २ लाख
कोकण प्रादेशिक विभाग : ४ लाख ५३ हजार
पुणे प्रादेशिक विभाग : १ लाख ९८ हजार

Web Title:  Replace '10 Lacks 37 thousand illiterate electricity meters'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.