विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात साकारली हिमालय पर्वताची प्रतिकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 01:09 PM2019-08-26T13:09:30+5:302019-08-26T13:12:07+5:30

श्रावण सोमवार; विठ्ठल मंदीरात अवतरला कैलास पर्वत

Replica of the Himalayan Mountains at Vitthal-Rukmini Temple | विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात साकारली हिमालय पर्वताची प्रतिकृती

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात साकारली हिमालय पर्वताची प्रतिकृती

googlenewsNext
ठळक मुद्दे- श्रावण सोमवारनिमित्त पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी- विठ्ठल -रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने वर्षभर राबविण्यात येतात विविध उपक्रम- मंदिरात करण्यात आलेल्या आरासामुळे विठ्ठलाचे रूप भाविकांचे घेत आहे लक्ष वेधून

पंढरपूर : चौथा श्रावण सोमवार निमित्त श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणी गाभाºयात कापसापासून हिमालय पर्वताची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सर्व हिंदू सण आणि विशेष दिनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात, सोळखांबी चौखांबी, गाभाºयात विविध प्रकारची फुले, फळे याद्वारे आकर्षक सजावट करण्यात येते.

आज चौथा श्रावण सोमवार आणि अजा स्मार्त एकादशीनिमित्त कापसापासून हिमालय पर्वताची प्रतिकृती साकारली आहे,  अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. 

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध प्रकारची आरास केल्यानंतर श्रींचे ते रूप भाविकांना आकर्षित करून घेते. दर्शनाबरोबरच भाविकांचे मन प्रसन्न, प्रफुल्लीत होते. एक प्रकारचे समाधान मिळते, त्यामुळेच हा उपक्रम सतत राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


 

Web Title: Replica of the Himalayan Mountains at Vitthal-Rukmini Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.