निवडणुकीत गैरप्रकार होतोय, अॅपवर तक्रार करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2017 04:20 AM2017-01-24T04:20:03+5:302017-01-24T04:20:03+5:30
राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये गैरप्रकार होत असेल आणि त्याबाबत माहिती देता येत नसेल तर ती तातडीने देण्यासाठी राज्य निवडणूक
संजय पाठक / नाशिक
राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये गैरप्रकार होत असेल आणि त्याबाबत माहिती देता येत नसेल तर ती तातडीने देण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने खास अॅप तयार केले असून, त्यावर माहिती टाकल्यास तत्काळ त्याची दखल घेतली जाणार आहे. याशिवाय गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची संक्षिप्त ‘कामगिरी’ वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली जाणार आहे.
राज्यात एकाच वेळी १० महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. निवडणुका म्हटल्या की, बाहुबली उमेदवार, पूर्ववैमनस्य आणि राजकीय वाद होतातच, परंतु मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी मतदान केंद्रे ताब्यात घेणे, तोतया मतदार उभे करणे असे अनेक प्रकार होत राहतात. अनेकदा तेथे यंत्रणा अपुरी पडते किंवा त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने ‘सिटीझन आॅन पेट्रोल’ (कॉप) हे अॅप तयार केले असून, त्यावर सर्वसामान्य नागरिकांनाही थेट माहिती देता येईल. अशा प्रकारची माहिती अॅपवर दिल्यानंतर तातडीने मतदार केंद्राच्या परिसरातील सर्व यंत्रणांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि यंत्रणा कृती करेल. त्यामुळे निवडणुकीतील गैरप्रकार टळण्यास मदत होणार आहे.
त्यामुळे आपल्या प्रभागातील कोणत्या उमेदवाराला मतदान करावे याचा निर्णय मतदाराला घेता येईल. सामान्यत: निवडणूक अर्ज दाखल करताना उमेदवारांना त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात द्यावी लागते. परंतु ही सर्वच माहिती नागरिकांपर्यंत पोहोचेल असे नाही, त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने यंदा काळजी घेतली आहे.