युवा धोरण समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर
By admin | Published: December 25, 2015 03:12 AM2015-12-25T03:12:50+5:302015-12-25T03:12:50+5:30
विदर्भ विकासासाठी युवाशक्तीच्या सहभागावर भर.
अकोला : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने गठीत केलेल्या युवा धोरण समितीचा अहवाल २२ डिसेंबर रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविण्यात आला. विदर्भासारखा अविकसित प्रदेश समृद्ध करण्यासाठी युवाशक्तीचा सहभाग वाढविण्यावर या अहवालात भर देण्यात आला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ह्ययुवा धोरणह्ण निश्चितीसाठी डॉ. संजय खडक्कार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली होती. या समितीने विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थी आणि विद्यापीठेतर युवकांच्या समकालीन संदर्भातील गरजा लक्षात घेऊन अभ्यास केला. युवाशक्ती सक्षम, सार्मथ्यवान करून तिच्या उर्जेचा वापर विदर्भासारखा अविकसित प्रदेश देशाच्या नकाशावर समृद्ध व संपन्न भूभाग म्हणून उभा करण्याचा उद्देश या युवा धोरणाचा असल्याचे समितीचे अध्यक्ष डॉ. खडक्कार यांनी सांगितले. या धोरणाचा अहवाल समितीने मुख्यमंत्र्यांकडे सादर केला. यावेळी प्रामुख्याने कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे, राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा व युवक कल्याण मुख्य सचिव नंदकुमार, नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पुरण मेश्राम व डॉ. डी. के. अग्रवाल यांचा समावेश होता.
यांचा होता समितीमध्ये समावेश
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ह्ययुवा धोरणह्ण निश्चितीसाठी डॉ. संजय खडक्कार यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या समितीमध्ये डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, प्रा. अंबादास मोहिते, डॉ. के. सी. देशमुख, मंगेश इंदापवार, डॉ. राहुल खराबे, डॉ. विनोद इंदूरकर, डॉ. अखिलेश पेशवे, डॉ. संजय ढोबळे व डॉ. प्रशांत कडू यांचा समावेश होता.