महिलांना रोखणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा- विखे
By admin | Published: April 4, 2016 03:13 AM2016-04-04T03:13:30+5:302016-04-04T03:13:30+5:30
न्यायालयाच्या निर्णयानंतरही शनि शिंगणापूरला शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास महिलांना मज्जाव करणे, ही गंभीर बाब आहे़ महिलांच्या छेडछाडीचाही प्रयत्न झाल्याचे समजते
शिर्डी : न्यायालयाच्या निर्णयानंतरही शनि शिंगणापूरला शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास महिलांना मज्जाव करणे, ही गंभीर बाब आहे़ महिलांच्या छेडछाडीचाही प्रयत्न झाल्याचे समजते. त्यामुळे दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली.
सोमवारी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले़ विश्वस्त मंडळाने कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करायला हवी, अन्यथा कारवाई करण्याची मागणी करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला़ विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीबाबत तक्रारी आल्या आहेत़ त्याचा आता संबंध नसला तरी न्यायालयाच्या निर्णयानंतरही महिलांना मज्जाव करण्यात येतो़ स्थानिक पोलीस प्रशासनाने आदेशाच्या अंमलबजावणीसाठी महिलांना संरक्षण द्यायला हवे होते़, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)