जानेवारीत निवृत्तिवेतनावर अहवाल
By Admin | Published: December 22, 2015 02:36 AM2015-12-22T02:36:05+5:302015-12-22T02:36:05+5:30
वित्त व ऊर्जामंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या तीनही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली
नागपूर : वित्त व ऊर्जामंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या तीनही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतन योजनेवर जानेवारीत अहवाल सादर करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि वीज कंपन्यांच्या व्यवस्थापनाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतन योजनेला मंत्रिमंडळाच्या उपसमितीने स्वबळावर लागू करण्यास मान्यता दिली. त्याचा अहवाल जानेवारीत सादर करण्याची सूचना दिल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. प्रलंबित योजनेवर ऊर्जामंत्री तातडीने निर्णय घेतील, अशी आशा मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)