प्रकाश आंबेडकरांशिवाय रिपब्लिकन ऐक्य अशक्य- रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 06:35 AM2022-01-16T06:35:11+5:302022-01-16T06:35:37+5:30
आंबडेकर यांचा वंचित बहुजन आघाडीला निवडणुकीत चांगली मते मिळाली. मात्र, मते खाण्याच्या आंबेडकरांच्या भूमिकेच्या मी विरोधात आहे, असे ते म्हणाले.
कल्याण : काही दिवसांपूर्वी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेडकरांना वगळून रिपब्लिकन ऐक्य केले जाणार असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र, प्रकाश आंबेडकरांना वगळून रिपब्लिकन ऐक्य शक्य नाही, असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
महाड महाविद्यालयाचे प्राचार्य धनाजी गुरव यांची शोकसभा शनिवारी जीवनदीप महाविद्यालयात झाली. याप्रसंगी आमदार किसन कथोरे, महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे आणि रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या शोकसभेनंतर आठवले यांनी वरील वक्तव्य केले. आंबडेकर यांचा वंचित बहुजन आघाडीला निवडणुकीत चांगली मते मिळाली. मात्र, मते खाण्याच्या आंबेडकरांच्या भूमिकेच्या मी विरोधात आहे, असे ते म्हणाले.
‘भाजपला हरविणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही’
उत्तर प्रदेशात जे भाजप सोडून गेले, त्यामुळे त्यांचेच नुकसान होईल. त्यांच्या सोडून जाण्याने भाजपला फरक पडणार नाही. विरोधकांसह अखिलेश यादव यांनी कितीही प्रचार केला तरी भाजपला हरविणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही, असा टोला आठवले यांनी अखिलेश यांना लगावला.