‘२६/११’तील जाँबाज अधिकाऱ्यांचा गौरव

By admin | Published: August 26, 2015 02:18 AM2015-08-26T02:18:31+5:302015-08-26T02:18:31+5:30

‘२६/११’चा हल्ला झाल्यावर त्या वेळी अतिरेक्यांचा प्रतिकार करणाऱ्या आठ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह ५० जणांना त्यांच्या कर्तबगारीसाठी मंगळवारी राजभवनात सन्मानित करण्यात आले

Reputation of the Junk officers in '26 / 11 ' | ‘२६/११’तील जाँबाज अधिकाऱ्यांचा गौरव

‘२६/११’तील जाँबाज अधिकाऱ्यांचा गौरव

Next

मुंबई : ‘२६/११’चा हल्ला झाल्यावर त्या वेळी अतिरेक्यांचा प्रतिकार करणाऱ्या आठ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह ५० जणांना त्यांच्या कर्तबगारीसाठी मंगळवारी राजभवनात सन्मानित करण्यात आले. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक व पोलीस शौर्यपदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.
केंद्रीय गृह विभागाच्यावतीने राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांना १५ आॅगस्ट २०१३ रोजी पदक जाहीर झाले होते. त्याचे वितरण करण्यात आले.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी ताज हॉटेलमध्ये शिरलेल्या अतिरेक्यांशी मुकाबला करणारे परिमंडळ -१ चे उपायुक्त आणि सध्या औरंगाबाद येथे विशेष पोलिस निरीक्षक असलेले विश्वास नांगरे-पाटील ,राजवर्धन (सहआयुक्त, नागपूर), दीपक ढोले (साहाय्यक आयुक्त, पाचपावली, नागपूर), साहाय्यक निरीक्षक नितीन काकडे, हवालदार अरुण माने, सौदागर शिंदे, अमित खेतले व पवार यांना राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक प्रदान करण्यात आले. त्यांच्यासह ५० जणांचा गौरव करण्यात आले. परदेशी सुकोजी देवांगण, पोलीस हवालदार गडचिरोली (मरणोत्तर), गोविंद बाली फरकाडे, पोलीस नाईक गडचिरोली (मरणोत्तर) व मुन्शी चिक्कू पुंगाटी, पोलीस शिपाई गडचिरोली (मरणोत्तर) यांना जाहीर झालेले पोलीस शौर्यपदक त्यांच्या नातलगांनी स्वीकारले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री सर्वश्री डा़ॅ़ रणजीत देशमुख (शहर) व राम शिंदे (ग्रामीण), अपर मुख्य सचिव (गृह) के़ पी़ बक्षी, पोलीस महासंचालक संजीव दयाळ, पोलीस आयुक्त राकेश मारीया उपस्थित होते.
समारंभाला इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी व सेवानिवृत्त अधिकारी तसेच गौरविण्यात येणाऱ्या पोलिसांचे कुटुंबीय उपस्थित होते. (प्रतिनिधी)

२६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात धाडसी कामगिरी बजावलेल्या ५० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज भवनातील दरबार हॉल येथे आयोजित समारंभात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Web Title: Reputation of the Junk officers in '26 / 11 '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.