अंनिसचे तहसीलदारांना निवेदन

By Admin | Published: July 22, 2016 02:17 AM2016-07-22T02:17:13+5:302016-07-22T02:17:13+5:30

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे २० जुलै ते २० आॅगस्ट हा एक महिना ‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ हे अभियान राबविण्यात येणार आहे.

Request for tahsildar of Anees | अंनिसचे तहसीलदारांना निवेदन

अंनिसचे तहसीलदारांना निवेदन

googlenewsNext


कर्जत : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे २० जुलै ते २० आॅगस्ट हा एक महिना ‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या तपासासंबंधी मागण्यांबाबत कर्जत समितीच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती कर्जत शाखेचे अध्यक्ष अशोक जंगले, कार्याध्यक्ष प्रल्हाद बोऱ्हाडे, रजनीकांत पवाळी, शोभा बोऱ्हाडे, जगदीश दगडे उपस्थित होते. त्यांनी तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. या निवेदनात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्रातील समाज सुधारक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून होवून ३५ महिने पूर्ण होत आहेत. याबाबत तपासासंबंधी मागण्यांचा या निवेदनात उल्लेख आहे.
>तपासासंबंधी मागण्या
सुधारक कॉ. गोविंदराव पानसरे यांची हत्या होवून १७ महिने पूर्ण होत आहेत. तसेच महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटक राज्यामध्ये अशाच प्रकारे प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचाही खून झाला. या घटनेलाही ११ महिन्यांचा कालावधी झाला आहे. याबाबत तपासासंबंधी मागण्यांचा उल्लेख निवेदनात आहे.

Web Title: Request for tahsildar of Anees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.